
IND vs NZ: 'King' Kohli has a golden opportunity against New Zealand! Virat is set to break Kumar Sangakkara's 'that' record.
Virat Kohli has a chance to set a record against New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप बीसीसीआयकडून संघ जाहीर करण्यात आलेला नाही. श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीमुळे संघ जाहीर होण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. दरम्यान, विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडण्याचीस संधी आहे.
हेही वाचा : Vijay Hazare Trophy 2025 : रिंकू सिंग एक्सप्रेस सुसाट! 38 कर्णधारांना दिला धोबीपछाड; केली नंबर 1 कामगिरी
विराट कोहलीने आतापर्यंत ५५६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये ६२३ डावांमध्ये ५२.५८ च्या सरासरीने २७,९७५ धावा फटकावल्या आहेत. जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ४२ धावा जास्त केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५९४ सामन्यांच्या ६६६ डावांमध्ये ४६.७७ च्या सरासरीने २८,०१६ धावा करणाऱ्या कुमार संगकाराला पिछाडीवर टाकेल. विराट कोहलीने ८४ शतके आणि १४५ अर्धशतके लागावळी आहेत. तर संगकाराने ६३ शतके आणि १५३ अर्धशतके झळकवली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर विराजमान आहे. ज्याने ६६४ सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये ४८.५२ च्या सरासरीने ३४,३५७ धावा फटकावल्या आहेत. तसेच रिकी पॉन्टिंग या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने ५६० सामन्यांमध्ये ६६८ डावांमध्ये २७,४८३ धावा काढल्या आहेत.
हेही वाचा : सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा
न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेचा पहिला सामना बीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारी रोजी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल. तिसरा एकदिवसीय सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.