Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा; रनआऊटच्या निर्णयावर मुनीबाचा नकार, कर्णधार फातिमा सना पंचांशी भिडली!

Muneeba Ali Runout: ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अली (१२ चेंडूंत २ धावा) हिला रनआऊट (Runout) देण्यात आला. या वादग्रस्त निर्णयामुळे पाकिस्तानी संघ संतापला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 05, 2025 | 09:40 PM
IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा (Photo Credit - X)

IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा
  • रनआऊटच्या निर्णयावर मुनीबाचा नकार,
  • कर्णधार फातिमा सना पंचांशी भिडली

IND W vs PAK W: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान वाद निर्माण झाला. ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अली (१२ चेंडूंत २ धावा) हिला रनआऊट (Runout) देण्यात आला. या वादग्रस्त निर्णयामुळे पाकिस्तानी संघ संतापला आणि त्यांनी पंचांशी वादही घातला, तर मुनीबा अलीने बराच वेळ मैदान सोडण्यास नकार दिला.

पंचांचा ‘यू टर्न’; आधी नॉट आऊट, नंतर बाद

क्रांती देवने टाकलेल्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हा सर्व गदारोळ झाला. मुनीबाविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील फेटाळल्यानंतर ती क्रीजच्या बाहेर पडली. त्याचवेळी दीप्ती शर्माने स्लिपमधून अचूक थ्रो केला आणि स्टंप्स उद्ध्वस्त केले. भारतीय संघाने रनआऊटची अपील केली. रनआऊटच्या रिप्लेमध्ये मुनीबाची बॅट सुरुवातीला क्रीजमध्ये दिसत होती. त्यामुळे तिसऱ्या पंचाने आंशिक रिप्ले पाहून तिला प्रथम नॉट आऊट घोषित केले. मात्र, संपूर्ण रिप्ले पाहिल्यानंतर लक्षात आले की, चेंडू स्टंपवर आदळला तेव्हा तिची बॅट हवेत होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी आपला आधीचा निर्णय उलटवला आणि मुनीबा अलीला बाद घोषित केले.

@cricketaakash – The wicket is about to come, After that a wicket came in the next over. What a prediction sir, I really salute you. Kranti Gaud to Muneeba Ali, THATS OUT!! Run Out!!#INDWvPAKW #ICCWomensWorldCup2025 pic.twitter.com/YPvzAS0KL1 — Asia Voice 🎤 (@Asianewss) October 5, 2025

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना

कर्णधार फातिमा सनाचा चौथ्या पंचांशी वाद

बाद झाल्यानंतरही मुनीबा अली बराच वेळ मैदानावरील पंचांशी बोलत राहिली आणि नंतर सीमारेषेजवळ उभी राहिली. दरम्यान, पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने थेट चौथ्या पंचांशी वाद घातला. मुनीबा अलीला बाद का देण्यात आले, याबद्दल तिने तर्क-वितर्क करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी निर्णय स्पष्ट केल्यानंतर अखेरीस परिस्थिती शांत झाली, परंतु पाकिस्तानी संघाने या निर्णयावर तीव्र असहमती दर्शविली.

नियमानुसार मुनीबा बाद कशी ठरली?

क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनचा नियम क्र. ३० (Rule 30 of Playing Conditions) नुसार:

  • बाद कधी? जर फलंदाज त्यांच्या क्रीजच्या बाहेर असेल आणि त्यांचा बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग क्रीजमध्ये नसेल, तर तो बाद असतो.
  • अपवाद: जर फलंदाज धावत असेल किंवा क्रीजच्या दिशेने डाईव्ह मारत असेल आणि त्यावेळी त्याची बॅट हवेत असली तरी तो बाद होत नाही.
  • मुनीबाच्या बाबतीत: मुनीबा अली धावत नव्हती किंवा डाईव्ह मारत नव्हती. त्यामुळे तिचा बॅट जमिनीपासून वर उचललेला असल्याने, नियमांनुसार तिला बाद घोषित करण्यात आले.

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

Web Title: Ind vs pak high voltage drama muneeba denies runout captain fatima sana argues with umpires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • ICC Women Cricket World Cup 2025

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!
1

IND W vs PAK W: रिचा घोषची तुफानी खेळी; टीम इंडियाने पाकिस्तानला दिले २४८ धावांचे आव्हान!

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’
2

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित
3

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

‘आझाद काश्मीर’ या वादग्रस्त विधानावर पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीरने सोडले मौन, म्हणाली – दुखावण्याचा हेतू नव्हता…
4

‘आझाद काश्मीर’ या वादग्रस्त विधानावर पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीरने सोडले मौन, म्हणाली – दुखावण्याचा हेतू नव्हता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.