पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही 'भाव' (Photo Credit- X)
कोलंबो: महिला विश्वचषक २०२५ मधील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा महामुकाबला कोलंबोच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन (Handshake) केले नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. भारतीय पुरुष संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जे केले होते, अगदी त्याचप्रमाणे हरमनप्रीतनेही ‘भाव’ न देता थेट दुर्लक्ष केले.
It’s time for some batting firepower 💥 Pakistan win the toss and #TeamIndia will bat first! 🏏 Catch the LIVE action ➡ https://t.co/CdmEhf3jle#CWC25 👉 #INDvPAK | LIVE NOW on Star Sports network & JioHotstar! pic.twitter.com/bqYyKrwFLt — Star Sports (@StarSportsIndia) October 5, 2025
हरमनप्रीत कौर (भारतीय कर्णधार): “आम्ही विश्वचषकापूर्वी येथे चांगली मालिका खेळली आहे. आम्ही सकारात्मक विचार करत आहोत आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची टीम चांगली समन्वय साधून आहे आणि आम्ही आजच्या सामन्यासाठी उत्सुक आहोत.”
भारतीय संघात एक बदल: अमनजोत कौरच्या जागी रेणुका सिंग ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
फातिमा सना (पाकिस्तानी कर्णधार): “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेटमध्ये थोडा ओलावा असू शकतो. आमचा आत्मविश्वास खूप चांगला आहे. आज आम्ही चांगला खेळ करू, अशी आशा आहे. २५० पेक्षा कमीचे कोणतेही लक्ष्य चांगले असेल.”
पाकिस्तानी संघात एक बदल: ओमैमा सोहेलच्या जागी सदाफ शमास हिला संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात आजवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ११ सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे, या सर्वच्या सर्व ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे, तर पाकिस्तानी संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही.
भारतीय महिला संघ: प्रतीक रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
पाकिस्तान महिला संघ: मुनीबा अली, सदाफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाज, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल