IND vs PAK: After defeating Pakistan, Tilak Verma touched the feet of Raghu in the team! The reason came to light, BCCI shared the video
Indian dressing room medal ceremony footage goes viral : रविवारी झालेल्या आशिया कपच्या सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. भारताने सुपर ४ फेरीची विजयी सुरुवात केली. या विजयाने भारतीय संघाने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या विजयानंतर भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण आत्मविश्वासाने भरलेले दिसून आले.
सामन्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये इम्पॅक्ट प्लेअर पुरस्काराची घोषणा केली गेली. हा पुरस्कार संघातील अशा खेळाडूंना अंतर्गत देण्यात येतो ज्यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला नाही परंतु संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याहे.
हा सन्मान यावेळी युवा फलंदाज तिलक वर्माला देण्यात आला. पाकिस्तानविरुद्ध वर्माने १९ चेंडूत ३० धावांची शानदार नाबाद खेळी साकारली. १३ व्या आणि १८ व्या षटकांच्या दरम्यान दबावाखाली पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि भारताला लक्ष्य गाठण्यास मोठी मदत मिळाली. पुरस्कार स्वीकारताना तिलक वर्मा खूपच भावनिक झालेला दिसून आला आणि त्यांनी संघातील सदस्य रघुविंद्र द्विगी यांच्या पायाला स्पर्श केला. ज्यामुळे सर्व संघातील सदस्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष निर्माण झाल्याचे दिसून आले.
A motivational speech 💬
An ‘Impactful’ finish 🔥 A summary of #TeamIndia‘s dominating start to the #Super4 with an inspiring presentation of ‘𝐈𝐦𝐩𝐚𝐜𝐭 𝐏𝐥𝐚𝐲𝐞𝐫 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐌𝐚𝐭𝐜𝐡’ medal 🥇#AsiaCup2025 — BCCI (@BCCI) September 22, 2025
तिलक वर्मा म्हणाला की, “मी खूप आनंदी असून मी मागील दोन वेळा सामना पूर्ण करू शकलो नाही, पण आज मला ती संधी मिळाली आणि मी संघासाठी ते करून दाखवले. गौती सरांनी म्हटल्याप्रमाणे, आपण विश्वचषकापर्यंत शिकत राहणार आहोत आणि प्रगती करत राहू.” अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला सुपर ४ टप्प्यात बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत दोन हात करावे लागणार आहे.
रघु नम्रपणे म्हणाला, “सर्वांना राम राम,” त्यानंतर त्याने एक प्रेरणादायी संदेश देखील दिला की प्रतिभा ही देवाने दिलेली आहे, म्हणून आपण नेहमीच नम्र राहायला हवे. प्रसिद्धी ही समाज आणि लोकांकडून मिळालेली देणगी आहे. म्हणून आपण त्याबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. एकाग्रता ही आपली स्वतःची अशी एक देणगी आहे, म्हणून आपण त्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. तो पुढे असे देखील म्हणाला की, प्रेरणा क्षणभंगुर असून शिस्त ही कायमस्वरूपी गुणवत्ता आहे. जी कोणत्याही खेळाडूला दीर्घकालीन यशाच्या मार्गावर ठेवत असते.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानने लाजच सोडली! भारताकडून पराभव जिव्हारी; पंचांना टार्गेट केल्याने नव्या वादाला जन्म