Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK, U19 World Cup : पराभवाचा काढला वचपा! भारताने पाकिस्तानला चारली 58 धावांनी धूळ; आयुष म्हात्रेची घातक गोलंदाजी  

आज २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये क्वीन्स स्पोर्ट्स क्लब बुलावेयो येथे खेळलया गेलेल्या सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाचा ५८ धावांनी पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 09:29 PM
IND vs PAK, U19 World Cup: Revenge taken! India thrashed Pakistan by 58 runs; Ayush Mhatre's lethal bowling.

IND vs PAK, U19 World Cup: Revenge taken! India thrashed Pakistan by 58 runs; Ayush Mhatre's lethal bowling.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK, Under-19 World Cup Live : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत १९ वर्षांखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव केला आहे. या विजयाने भारताने आशिया कपमधील पराभवाचा बदला काढला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत वेदांत त्रिवेदीच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा केल्या. प्रतिउत्तरात पाकिस्तान संघ ४६.२ षटकात १९४ धावांवर गारद झाला आणि भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का! T20 वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना होणार नाही; पाकिस्तान सरकारचा धक्कादायक निर्णय

क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत १९ वर्षांखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले होते. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला  आणि भारतीय संघघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सुरवात चांगली झाली नाही. संघाने  भारताचे८.१ षटकातच ४७ धावांवरच महत्वाचे ३ फलंदाज माघारी गेले. आरोन जॉर्ज १६ धावा, भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे ० धावा, वैभव सूर्यवंशी ३० धावा करून बाद झाले. वेदांत त्रिपाठी वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्रिपाठीने ९८ चेंडूत महत्वपूर्ण ६८ धावा केल्या. तसेच कनिष्क चौहानने देखील ३५ धावा करून महत्वाचे योगदान दिले आणि भारताने सर्वबाद २५२ धावा उभ्या केल्या. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि मोहम्मद सय्यमने २ विकेट्स काढल्या. तसेच अली हसन बलोच, अली रझा, मोमीन कमर आणि अहमद हुसैन यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

पाकिस्तान १९४ धावांवर गारद

भारताने दिलेल्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरेलल्या पाकिस्तान संगहची सुरवात चांगली झाली नाही. संघाला २३ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर  समीर मिन्हास आणि उस्मान खान या जोडीने ६५ धावांची भागीदारी केली. हमजा जहूर ४२ धावा करून बाद झाला. त्यानंतर फरहान युसफ आणि उस्मान खान यांनी डाव सावरला आणि पाकिस्तान संघ विजयाच्या दिशेने जाऊ लागला होता. या जोडीने ६३ धावांची भागीदारी केली. परंतु, कर्णधार फरहान युसफ ३८ धावा करून बाद झाला आणि पाकिस्तानच्या विकेट्सला गळती लागली. त्यानंतर उस्मान खानने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो बाद झाला. त्याने ९२ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याला आयुष म्हात्रेने बाद केले.

A big performance on the big stage! 🙌 Kanishk Chouhan is the Player of the Match for his valuable all-round contributions as India U19 win by 5️⃣8️⃣ runs 👏 Scorecard ▶️ https://t.co/9EQew1omYY #U19WorldCup pic.twitter.com/5qwwp0S4Og — BCCI (@BCCI) February 1, 2026

उस्मान खान बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले आणि भारताचा विजय निश्चित केला. हुजैफा अहसान १४ धावा, अली हसन बलोच ३ धावा, अहमद हुसैन २ धावा, अब्दुल सुभान ७ धावा, मोमीन कमर ० धावा, मोहम्मद सय्यम ३ धावा करून आबाद झाले तर अली रझा ० धावा करून नाबाद राहिला. परिणामी पाकिस्तान ४६.२ षटकात १९४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर हेनिल पटेल,आरएस अंबरिश,खिलन पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

दोन्ही संघ खालीलप्रामाणे

पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा

भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

 

Web Title: Ind vs pak u19 world cup india defeated pakistan by 58 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • IND vs PAK U19
  • U19 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK, Under-19 World Cup Live : भारताचे पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य; वेदांत त्रिपाठीचे झुंजार अर्धशतक
1

IND vs PAK, Under-19 World Cup Live : भारताचे पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य; वेदांत त्रिपाठीचे झुंजार अर्धशतक

IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी;  मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स 
2

IND vs PAK, Under-19 World Cup Live : बुलावेयोमध्ये भारत अडचणीत! वैभव, आयुषसह 3 गडी माघारी;  मोहम्मद सय्यमच्या 2 विकेट्स 

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी
3

IND vs PAK, Under-19 World Cup Live : उपांत्य फेरीसाठी महासंग्राम! पाकचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी

IND vs PAK, Under-19 World Cup 2026 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची पडली विकेट! हा ‘स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर 
4

IND vs PAK, Under-19 World Cup 2026 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची पडली विकेट! हा ‘स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.