
IND vs PAK, Under-19 World Cup 2026: Pakistan suffers a setback before the match against India! This 'star player' is out of the tournament.
Pakistan’s Mohammad Shayan is out of the competition : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान १ फेब्रुवारी रोजी सुपर सिक्स सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना जास्त महत्त्वाचा आहे, कारण उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे. तथापि, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद शायन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. सराव सत्रादरम्यान शायनच्या नाकाला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला उर्वरित सामन्यांपासून मुकावे लागणार आहे. शायनला वगळल्यानंतर, पाकिस्तानने त्याच्या जागी अब्दुल कादिरला संघात स्थान देण्यात आले आहे. कादिर आधीच संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात करण्यात आलेला होता.
हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I :कर्णधार म्हणून सूर्या रचणार इतिहास! एका षटकारासह घालेल विक्रमाचा धुमाकुळ
आयसीसीने शनिवारी एका निवेदनामध्ये म्हटले आहे की, “आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने अब्दुल कादिरला पाकिस्तान संघात मोहम्मद शायनच्या जागी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.”
शुक्रवारी झालेल्या प्रभावी विजयानंतर, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासोबत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. चौथा उपांत्य फेरीचा संघ रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सुपर सिक्स सामन्यातील विजेत्या संघाद्वारे निश्चित होणार आहे. भारताला मोठी सोपी संधी असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास ते गट २ मधील अव्वल क्रमांकाच्या संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश करणार. पाकिस्तान बाबत सांगायच झालं तर, पाकिस्तानला विजय मिळवणे पुरेसे असणार नाही. पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आणि पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघाला पिछाडीवर टाकावे लागणार आहे. तरच उपांत्य फेरीत पोहोचण्याची पाकिस्तानला संधी मिळणार आहे.
जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्याला गट २ च्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविण्यासाठी आणि भारताला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी १०५ किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. जर पाकिस्तान संघाने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली, तर त्याला जलद गतीने लक्ष्य गाठणे आवश्यक असणार आहे. एक साधा विजय पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचवण्यात यशस्वी ठरणार नाही.