Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM Live score, U19 World Cup : विहान मल्होत्राचा नाबाद शतकी तडाखा! भारताचा झिम्बाब्वेसमोर 353 धावांचा डोंगर

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघाने विहान मल्होत्राच्या नाबाद शतकाच्या जोरावर झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघासमोर ३५३ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 27, 2026 | 05:59 PM
IND vs ZIM Live score, U19 World Cup: Vihan Malhotra's unbeaten century! India sets a massive target of 353 runs against Zimbabwe.

IND vs ZIM Live score, U19 World Cup: Vihan Malhotra's unbeaten century! India sets a massive target of 353 runs against Zimbabwe.

Follow Us
Close
Follow Us:

India has set a target of 353 runs for Zimbabwe :  आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघ  आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले आहेत. बुलावायो येथे खेळल्या जात असेलल्या या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत विहान मल्होत्राच्या नाबाद शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३५२ धावांचा डोंगर उभा केला आहे. झिम्बाब्वेला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर ३५३ धावा कराव्या लागणार आहेत. झिम्बाब्वेकडून ततेंडा चिमुगोरोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I: ‘मिस्टर 360’ च्या रडारवर खास विक्रम! मैदानावर ‘हा’ पराक्रम करताच ‘रो-को’च्या क्लबमध्ये करणार एंट्री

झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली. आरोन जॉर्ज आणि  वैभव सूर्यवंशी यांनी संघाला ४.१ षटकातच ४४ धावांची सलामी दिली. दरम्यान, आरोन जॉर्ज २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत डाव सावरला.  या दोघांनी ६६ धावा जोडल्या. आयुष म्हात्रे २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी अर्धशतक करून माघारी परतला. तसेच वेदांत त्रिपाठी १५ धावा करून बाद झाला. भारताच्या १३० धावांवर ४ विकेट्स गेल्या होत्या.

Innings Break! Vihaan Malhotra’s brilliant century leads India U19’s charge against Zimbabwe U19 in the Super Six clash 💯👊 Over to our bowlers as we defend 3⃣5⃣2⃣ runs 🎯 Scorecard ▶️https://t.co/juFENSDomr #U19WorldCup pic.twitter.com/f4YB9ulNkB — BCCI (@BCCI) January 27, 2026

त्यानंतर विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी डाव सावरत ११३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अभिज्ञान कुंडू अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ६२ चेंडूत ६१ धावा केल्या. या दरम्यान, त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तथापि, विहान मल्होत्रा ​​शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने त्याचे शतक पूर्ण केले. खिलन पटेलने १२ चेंडूत ३० धावांची खेळी केल्यामुळे भारताला ३५० धावांचा टप्पा पार करता आला.  विहानने १०७ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार लगावले. झिम्बाब्वेकडून ततेंडा चिमुगोरोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर सिम्बराशे मुडझेनगेरे आणि पानशे माझाई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ध्रुव पटेलला एक विकेट मिळाली.

𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗 💯 Vihaan Malhotra rises to the occasion with a well-structured knock 👏 👏 Scorecard ▶️https://t.co/juFENSDomr #U19WorldCup pic.twitter.com/sL1ozP7asg — BCCI (@BCCI) January 27, 2026

हेही वाचा : ‘क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य, योग्य वेळ आली….’ संकटमोचक केएल राहुलचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा; क्रिकेट जगतात खळबळ

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

झिम्बाब्वे अंडर-19 प्लेइंग 11: नॅथॅनियल हलाबांगना (यष्टीरक्षक), ताकुडझ्वा माकोनी, कियान ब्लिग्नॉट, वेबस्टर मधिधी, ध्रुव पटेल, लिरॉय चिवौला, सिम्बराशे मुडझेनगेरे (कर्णधार), ब्रँडन सेन्झेरे, मायकेल ब्लिग्नॉट, तातेंडा चिमुगोरो, पानशे माझाई

भारत अंडर-19 प्लेइंग 11: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन.

Web Title: Ind vs zim u19 world cup thanks to vihaans unbeaten century india sets a target of 353 runs against zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • ICC U19 World Cup
  • IND VS ZIM
  • Vaibhav Suryavanshi
  • Vihaan Malhotra

संबंधित बातम्या

Under-19 World Cup 2026 :  वैभव सूर्यवंशी एक्सप्रेस सुसाट! झिम्बाब्वेविरुद्ध २४ चेंडूत ठोकले अर्धशतक; रचला इतिहास 
1

Under-19 World Cup 2026 :  वैभव सूर्यवंशी एक्सप्रेस सुसाट! झिम्बाब्वेविरुद्ध २४ चेंडूत ठोकले अर्धशतक; रचला इतिहास 

IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
2

IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

IND U19 vs ZIM U19 : Vaibhav Suryavanshi सुपर-6 मध्ये करणार कहर, तुम्ही या चॅनेलवर सामना पाहू शकता सामना! वाचा संपूर्ण तपशील
3

IND U19 vs ZIM U19 : Vaibhav Suryavanshi सुपर-6 मध्ये करणार कहर, तुम्ही या चॅनेलवर सामना पाहू शकता सामना! वाचा संपूर्ण तपशील

Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 
4

Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.