
India vs South Africa 1st T20I Live Streaming : कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका आता टी२०आय मालिकेत एकमेकांसमोर येतील. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी पाच सामन्यांची टी२०आय मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, ९ डिसेंबर रोजी खेळला जाईल.
कटक, चंदीगड, धर्मशाला, लखनौ आणि अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. कसोटी मालिका ०-२ ने गमावल्यानंतर, भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन केले आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. आता, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर लक्ष केंद्रित केले आहे आणि सर्वांना मालिका विजयाची अपेक्षा आहे. तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना चाहते कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकतात ते जाणून घेऊया?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु होणाऱ्या मालिकेचा पहिला सामना हा मंगळवार, दि ९ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन कटक येथील बाराबती स्टेडियम येथे करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 6.30 मिनिटांनी होणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टार क्रिकेट चाहत्यांना पाहयला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिका मागील दोन महिन्यापासून भारत दौऱ्यावर आहे, कसोटी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली होती तर एकदिवसीय मालिकेमध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. आता टी20 मालिकेमध्ये कोण विजय नावावर करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हरदीप यादव, हरदीप यादव, सनदीप यादव.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅनसेन, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), डोनोव्हन फरेरा (विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, एन क्यूरिच महाराज, एन क्यूएएन, एम. नॉर्टजे.