
Ind vs Sa 2nd Test: Indian team in the shadow of defeat! Ravindra Jadeja started making excuses; What is the reason for the worsening situation?
Ind vs Sa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज संपला असून भारतासाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ५४९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवून आधीच आपली पकड निर्माण केली आहे. प्रत्युत्तरादाखल, दिवसअखेर भारतीय संघाने फक्त २७ धावांतच आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. त्यामुळे, पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर हा सामना अनिर्णित ठेवण्याचे आव्हान असणार आहे. परंतू दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या आक्रमक गतीमुळे हे आव्हान कठीण होणार असल्याचे चित्र आहे.
जडेजाने दिली प्रतिक्रिया
चौथ्या दिवसाच्या खेळानंतर, रवींद्र जडेजा यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्याने संघाची जी परिस्थिती मान्य केली, परंतु टॉस गमावल्यामुळे परिस्थिती बिघडू लागली असल्याचे त्याने म्हटले आहे. रवींद्र जडेजाने म्हटले की, २०१९ ची मालिका आणि सध्याची परिस्थिती यात फारसा फरक नाही, परंतु क्रिकेटमध्ये वेळ आणि सुरुवात महत्त्वाची असते. रवींद्र जडेजाने ही देखील स्पष्ट केले की, “जर आपण नाणेफेक जिंकली असती तर गोष्ट फार वेगळी असती. पहिल्या डावातील फायदा खूप मोठा झाला असता, पण तो खेळाचा भाग आहे आणि आपल्याला तो स्वीकारून पुढे जावे लागणार आहे.” रवींद्र जडेजाच्या विधानावरून संघाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे भारतीय खेळाडूंवर किती दबाव येत आहे याची स्पष्टता येते.
जडेजाने असे देखील स्पष्ट केले की भारताचा विजय म्हणजे आता शेवटच्या दिवसापर्यंत सामना अनिर्णित ठेवणे हा असणार आहे. खेळाडूंनी त्यांच्या बचावात्मक तंत्रावर अवलंबून राहून संयमाने खेळयला हवे असे देखील जडेजा म्हणाला. रवींद्र जडेजाने सांगितले की, “जर आपण संपूर्ण दिवस टिकून राहिलो तर ते आपल्यासाठी विजयासारखे असणार आहे. प्राधान्य म्हणजे योग्य शॉट निवडणे आणि विकेट वाचवणे हे असणार आहे.”
चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी दबावाखाली दिसून आले
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. संघाला सावध सुरुवात करण्याची आवश्यकता असताना भारताने आपले दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वालला मार्को जॅनसेनने बाद केले, तर केएल राहुल सायमन हार्मरने माघारी पाठवले. त्यामुळे सुरुवातीच्या या दोन फटक्यांनी टीम इंडियाला चांगलेच अडचणीत आणले.
सध्या, साई सुदर्शन आणि नाईटवॉचमन कुलदीप यादव क्रीजवर असून साई सुदर्शन(२ धावा) आणि कुलदीप यादव(४ धावा ) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेन आणि हार्मर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.