
Ind vs Sa 2nd Test: Have you seen Superman Marco Janssen? He took an amazing catch and made a fool of himself; Watch the video
Marco Jansson’s amazing catch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षांनी भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवले आणि मालिका खिशात टाकली आहे. गुवाहटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला. यासह टेम्बा बावुमा आणि कंपनीने भारताला क्लीन स्वीपही दिला. या सामन्यात भारतीय डाव संपवणाऱ्या मार्को जॅन्सनच्या शानदार झेलची चर्चा सुरू झाली आहे.
खरं तर, गुवाहाटी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ५४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताचा डाव १४० धावांवर गडगडला आणि दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.
MARCO JANSEN IS GENERATIONAL pic.twitter.com/EiNfRGTbRs — rishi (@rishi__w) November 26, 2025
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ही शेवटची जोडी मैदानावर होती. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने ६४ वे षटक टाकले. त्याने पहिल्याच चेंडूवर जडेजाला बाद केले होते. दरम्यान, षटकाच्या पाचव्या चेंडूवर सिराजने एक शक्तिशाली हवाई शॉट मारला खरा, चेंडू उंच उडाला आणि लाँग-ऑन सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा मैदानात उभा असणारा मागून विरुद्ध दिशेने धावणारा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जॅनसेनने विरुद्ध दिशेने डायव्ह मारला आणि एका हाताने झेल घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होत आहे.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९९-२००० नंतर भारतात पहिली कसोटी मालिका जिंकली. या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी पराभव केला होता.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव! पंत आर्मीला 408 धावांनी धूळ चारत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास
दक्षिण आफ्रिकेच्या ५४९ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा दुसरा डाव १४० धावांवरच कोसळला आणि दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने सामना आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा(५४ धावा) वगळता इतर सर्व फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने सहा आणि केशव महाराजने दोन विकेट घेतल्या आपरिनामी दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.