स्मृती नाही, तर पलाशने स्वतः ढकलली लग्नाची तारीख पुढे (Photo Credit - X)
वडिलांच्या आजारपणाने पलाशला आला तणाव
लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे दिसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे सर्वात आधी लग्नाचे विधी थांबवण्यात आले. या घटनेनंतर लगेचच होणाऱ्या नवरदेवाची, पलाश मुच्छलचीही तब्येत बिघडली. सततचा प्रवास, कॉन्सर्ट्स आणि लग्नाच्या तयारीमुळे पलाश खूप तणावात (Stress) आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि ऍसिडिटीच्या तक्रारीमुळे सांगली येथील रुग्णालयात दाखल केले गेले आणि नंतर अधिक काळजी म्हणून मुंबईतील गोरेगाव येथील एसव्हीआर रुग्णालयात हलवण्यात आले.
हे देखील वाचा: लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक?
“तो खूप रडत होता…” पलाशने घेतला भावनिक निर्णय
पलाशची नेमकी स्थिती किती गंभीर आहे, याची अधिकृत माहिती अद्याप नसली तरी, लग्नाच्या नवीन तारखेबद्दल अनिश्चितता वाढली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे कळताच लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय खुद्द पलाशने घेतला. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले, “पलाशचे अंकल (श्रीनिवास मंधाना) यांच्याशी खूप घट्ट नाते आहे… अनेकदा स्मृतीपेक्षाही जास्त.
जेव्हा ते आजारी पडले, तेव्हा सर्वात आधी पलाशनेच सांगितले की, अंकल पूर्णपणे बरे होईपर्यंत फेरे होणार नाहीत.” त्यांनी पलाशच्या भावनिक स्थितीबद्दल सांगितले की, मानधना कुटुंबाच्या अडचणीच्या बातमीने पलाशला भावनिक धक्का बसला.
“हळदीचा कार्यक्रम झाल्यापासून आम्ही त्याला बाहेर जाऊ दिले नाही. तो रडत रडत इतका तणावात आला की त्याची तब्येत बिघडली. त्याला चार तास रुग्णालयात ठेवून IV ड्रिप, ECG आणि इतर आवश्यक तपासण्या कराव्या लागल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण पलाशवर तणावाचा खूप परिणाम झाला आहे.”






