दक्षिण आफ्रिकेने केला भारताचा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं! जर ती तोडली तर…
गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने सर्व विकेट गमावून ४८९ धावा उभ्या केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून सेनुरन मुथुस्वामीने सर्वाधिक १०९ धावा केल्या होत्या. तर मार्को जॅन्सेननेही ९३ धावा केल्या. तसेच एडेन मार्करामने ३८, रायन रिकेल्टनने ३५, ट्रिस्टन स्टब्सने ४९, कर्णधार टेम्बा बावुमाने ४१, टोनी डी जॉर्गी २८, वियान मुल्डरने १३ आणि काइल व्हेरेनने ४५ धावा केल्या, ज्यामुळे संघ मजबूत स्थितीत जाऊयान पोहचला होता. भारताकडून कुलदीप यादवने डावात ४ बळी टिपले होते, तर रवींद्र जडेजा, सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांच्या प्रत्युत्तरात, भारतीय संघ पहिल्या डावात २०१ धावाच करू शकला. पहिल्या डावाच्या आधारे, दक्षिण आफ्रिकेने २८८ धावांची आघाडी घेऊन सामन्यावर पकड निर्माण केली होती. भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालनेस सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा करून संघाला सावरले होते. दक्षिण आफ्रिकेकडून जानसेनने सर्वाधिक ६ बळी टिपले होते.
दक्षिण आफ्रिकेने उभाराला ५४९ धावांचा डोंगर
२८८ धावांच्या आघाडीनंतर, दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि .दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने ५ बाद २६० धावांवर आपला डाव घोषित करून भारतासमोर ५४९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक ९४ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि सुंदरने १ बळी टिपला.
दक्षिण आफ्रिकेच्या ५४९ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा दुसरा डाव १४० धावांवरच आटोपला. दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने सामना आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा या एकमेव भारतीय फलंदाजाने अर्धशतक झळकावले परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यास यशस्वी ठरला नाही. त्याच्याशिवाय इतर सर्व फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. रवींद्र जडेजा ५४ धावांवर माघारी गेला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने सहा आणि केशव महाराजने दोन विकेट घेतल्या आपरिनामी दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.






