
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gautam Gambhir press Conference : मागील अनेक दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियावर सातत्याने टीका केली जात होती. यामध्ये विशेषत: भारताचे कोच गौतम गंभीर यांच्यावर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केली जात होती. एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली या मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना 9 विकेट्सने जिंकला आणि मालिका नावावर केली आहे. यामध्ये भारताच्या गोलंदाजांची त्याचबरोबर फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे.
मालिका झाल्यांनंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा राग पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने मालिका २-१ ने जिंकली. मालिका जिंकल्यानंतरही, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर फारसे खूश दिसत नव्हते. त्यांनी कसोटी मालिकेतील पराभवानंतर झालेल्या ट्रोलिंगची आठवणही केली. एका प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय मुख्य प्रशिक्षक गंभीर थोडे चिडलेले दिसले. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सह-मालकाला एक सूक्ष्म इशाराही दिला.
Virat Kohli आणि Gautam Gambhir मध्ये सगळं ठीक नाहीये का? व्हायरल व्हिडिओमुळे उडाला गोंधळ
विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेत उपस्थित होते. एका पत्रकाराने त्यांना विचारले की ते मैदानाबाहेरील बातम्या कशा हाताळतात. त्यावर गंभीर रागाने म्हणाला, “लोक आणि माध्यमे विसरले आहेत की जेव्हा संघाचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज आणि कर्णधार फलंदाजी करू शकला नाही तेव्हा आम्ही पहिली कसोटी फक्त 30 धावांनी गमावली. बरेच लोक बरेच काही बोलत आहेत, काही जण त्यांच्या सीमा ओलांडून जात आहेत, जसे की आयपीएल मालक स्प्लिट कोचिंग सुचवत आहे. आम्ही कोणाच्याही सीमा ओलांडत नाही, म्हणून लोकांनी त्यांच्या मर्यादा ओलांडून राहणे महत्वाचे आहे.”
आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २-० ने कसोटी मालिकेतील पराभवानंतर सोशल मीडियावर कोचिंगवर भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही याच्या जवळपासही नाही आहोत. घरच्या मैदानावर किती भयानक पराभव झाला! मला आठवत नाही की आमचा कसोटी संघ घरच्या मैदानावर इतका कमकुवत होता!!! जेव्हा आम्ही रेड-बॉल तज्ञांची निवड करत नाही तेव्हा असेच घडते.
हा संघ रेड-बॉल फॉरमॅटमध्ये आमची ताकद अजिबात प्रतिबिंबित करत नाही. भारताने कसोटी क्रिकेटसाठी रेड-बॉल तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करण्याची वेळ आली आहे.” टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांच्या निवेदनात या पोस्टचा संदर्भ देत होते.