
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारताच्या संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर, टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सामना जिंकणारा खेळाडू श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर पडू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर अय्यर बराच काळ रुग्णालयात होता. यामुळे, त्याच्या दुखापतीतून बरा होण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अय्यर पुनरागमन करू शकेल अशी आशा आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेताना अय्यरला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागले. अय्यरला सिडनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अय्यर जानेवारीमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निळ्या जर्सीमध्ये परतू शकतो. अय्यरचे वर्चस्व टीम इंडियाच्या मधल्या फळीत दिसून येते आणि म्हणूनच त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला जाणवेल.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨 As per medical reports, Shreyas Iyer will need over a month to regain match fitness, making him doubtful for the ODI series against South Africa. 🤕#INDvSA #ShreyasIyer #Sportskeeda pic.twitter.com/EGOC95nTiB — Sportskeeda (@Sportskeeda) November 11, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान, भारताचे सुपरस्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावरील जबाबदारी वाढेल. अय्यरच्या अनुपस्थितीत, दोन्ही अनुभवी खेळाडूंना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. पंत बराच काळ एकदिवसीय संघाबाहेर आहे. त्याच्या अपघातानंतर, पंतने खूप कमी एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामुळे त्याला एकदिवसीय संघात पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.
पंत सध्या फक्त कसोटी स्वरूपात खेळतो. भारताचे अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मोहम्मद शमी मागील अनेक वर्षापासून दुखापतीमुळे संघामध्ये कायमचे स्थान त्याला मिळवता आले नाही. जसप्रीत बुमराह देखील बऱ्याचदा तो दुखापतीमुळे अनेक मालिकांमध्ये उपस्थित राहत नाही.