
IND vs SA: Dhruv Jurel to take the field in the first Test against South Africa! 'Ya' star player will have to sit on the bench
IND vs SA 1 st Test series : भारतीय संघ शुक्रावरपासून दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायला सुरुवात करणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. त्यांनी बुधवारी संगीतले की, युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला त्याच्या उत्कृष्ट फॉर्म बघता पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी देण्यात येईल. तर अष्टपैलू नितीश रेड्डीला बाहेर ठेवावे लागेल.
टेन डोइशेट यांनी पत्रकार परिषदेत हे देखील स्पष्ट केले की, “आता आम्हाला संघ संयोजनाबाबत पूर्ण स्पष्टता असून गेल्या सहा महिन्यांतील ध्रुवची कामगिरी शानदार राहिली आहे. विशेषतः बेंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दोन शतके झळकावल्यानंतर त्याचे स्थान जवळजवळ निश्चित आहे.” त्यांनी पुढे असे देखील सांगितले की संघ व्यवस्थापनाचे प्राथमिक लक्ष सामने जिंकण्यासाठी योग्य रणनीती विकसित करण्यावर असणार आहे.
हेही वाचा : “भारताकडून खेळायचे असेल तर…,”BCCI ने दिला रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सज्जड दम; दिग्गजांचे भवितव्य संकटात
“नितीशबद्दलचा आमचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही.” ऑस्ट्रेलियामध्ये त्याला फारशा संधी मिळाल्या नव्हत्या, पण या मालिकेतील परिस्थिती पाहता, या कसोटीत त्याची खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात येऊ शकते.
ऋषभ पंत तंदुरुस्त झाल्याने, तो आता यष्टीरक्षकाची भूमिका बजावण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. जुरेलची अलीकडील स्थानिक कामगिरी शानदार राहिली आहे. तेच्या खेळत कमालीचे सातत्य दिसून आले आहे. ध्रुव जुरेलने १४०, १ आणि ५६, १२५, ४४ आणि ६, १३२ आणि नाबाद १२७ धावा फटकाल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत त्याने आपले पहिले कसोटी शतक देखील झळकावले होते.
हेही वाचा : PAK vs SL : इस्लामाबादमधील आत्मघातकी हल्ल्यानंतर श्रीलंकन संघाच्या सुरक्षेत वाढ! हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू
दहा डोइशेटेने हे देखील कबूल केले की जुरेलच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि फॉर्मकडे दुर्लक्ष करणे अशक्य असणार आहे. ते पुढे म्हणाले की ध्रुवने प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलेले आहे. तो आत्मविश्वासू, शिस्तप्रिय आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये पारंगत असून असे खेळाडू संघाची संपत्ती असतात. पहिल्या कसोटीत जुरेलच्या सहभागामुळे भारतीय संघ एक मजबूत मधली फळी मिळेल अशी अपेक्षा आहे, तर नितीश रेड्डीला त्याच्या खेळण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.