भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 140 धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांची विशेष कामगिरी राहिली टीम इंडियाचा तिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी संघाला चार विकेट्स मिळवून दिले.
क्रिकेटमध्ये, फुल-लेंथ डायव्हिंग कॅच घेणे सोपे नसतो. असा कॅच घेणे प्रत्येकाच्याच हातात नसते, विशेषतः स्क्वेअर लेगवर. तथापि, भारताचा २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने एक अद्भुत कामगिरी केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या अधचणीत वाढ झाली आहे. त्याच्या विरुद्ध त्याच्याच एजन्टकडून खटला भरण्यात आला आहे.
आता बातमी येत आहे की अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. रेड्डी जिम दरम्यान जखमी झाला. त्याच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे तो आगामी दोन्ही…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन बड्या खेळाडूंना माघारी पाठवले. या कामगिरीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.
आता भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्न मॉर्केल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये नितेश कुमार रेड्डी की शार्दुल ठाकूर या दोघांमधील कोणाला संधी मिळणार यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने कोणतेही उत्तर देण्यास…
विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर सराव करत आहे. तर त्याची जोडीदार अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आली आहे. तीने विराट कोहलीच्या नकळत पाच वर्षांपूर्वी क्रिकेटपटू नितीश रेड्डीची मदत केली होती.
सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालीच या सीझनमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. मोहम्मद शमी १४ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.
सामना संपल्यानंतर नितीश रेड्डी यांच्या कुटुंबीयांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची स्टेडियममध्ये भेट घेतली. नितीशच्या आई-वडिलांनी समालोचक झालेल्या या महान क्रिकेटरच्या चरणांना स्पर्श केला.
नितीश कुमार रेड्डीच्या शतकाच्या जोरावरच भारताला फॉलोऑन पुढे ढकलून ही धावसंख्या गाठता आली. या अष्टपैलू खेळाडूने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्येही आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी दाखवली
शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची प्रतिक्रिया झटपट व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही.
शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात पावसाने अडथळा निर्माण केला. पण त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला आहे. यानंतर भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने त्याच्या करियरचे पहिले शतक ठोकल आहे.
आता सध्या नितीश कुमार रेड्डीने त्याचे पहिले कसोटी आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले त्यानंतर त्याचे खास अंदाजात सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नितीश कुमार रेड्डी यांनी मेलबर्नमध्ये कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी संघात निवड करून निवड समितीने योग्य निर्णय घेतल्याचे त्याने दाखवून दिले.
बॉर्डर गावस्कर ट्राॅफीत आज भारतीय फलंदाजांनी निराश केले. परंतु, नितीश रेड्डी आणि ऋषभ पंतने शानदार खेळीने गड राखला. नितीश रेड्डीने दमदार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली.
बीसीसीआयने घोषित केलेल्या संघामध्ये भारताच्या अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कसोटी पदार्पण करताना दिसणार आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा T२० सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेमध्ये आघाडी घेत…