विराट कोहली आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने २९ जून २०२४ रोजी टी-२० क्रिकेटमधून आणि मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रिय आहेत. दोन्ही खेळाडू ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळले होते. या मालिकेत रोहितने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद शतक ठोकून आपली क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली होती. तर विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले होते. तथापि, असे असून देखील, भारतीय संघाने एकदिवसीय मालिका १-२ ने अशी गमावली होती.
हेही वाचा : IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज
इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने दोघांना देखील सांगितले की जर त्यांना भारताकडून खेळायचे असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे. रोहित आणि कोहली दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्त झाले असल्याने, त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.
रोहित शर्माकडून विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे. कोहलीच्या सहभागाची अद्याप पुष्टी झालेली नाही. कोहली शेवटचा २०१० मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळलेला आहे. कोहली शेवटचा विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा : PAK vs SL : इस्लामाबादमधील आत्मघातकी हल्ल्यानंतर श्रीलंकन संघाच्या सुरक्षेत वाढ! हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू
याव्यतिरिक्त, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी देखील त्याच्या उपलब्धतेची माहिती दिली आहे. ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा २६ नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. तथापि, ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमुळे रोहितच्या या टी-२० स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ घोषित केलेला नाही. तरी, रोहित शर्माचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या बॅटने शानदार कामगिरी केली होती.






