
IND vs SA: Who will India give a chance to on the red pitch of Guwahati? What will be the playing-11? Read in detail
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुवाहाटी कसोटी सामन्यात लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता असण्याची वर्तवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजांना या पृष्ठभागावर उसळी आणि वेगाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर फिरकीपटूंना तीव्र वळणाची अपेक्षा असणार आहे. याचा अर्थ असा की खेळपट्टी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच भारतीय संघ त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शक्यता आहे.
संघात सर्वात मोठा बदल अष्टपैलू खेळाडूंच्या स्थानात दिसण्याची शक्यता आहे. तरुण नितीश कुमार रेड्डी अक्षर पटेलची जागा घेऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. रेड्डीचे वैशिष्ट्य म्हणजे तो वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त पाठिंबा देतो आणि त्यांची उपस्थिती बुमराह आणि सिराज यांना देखील दिलासा देणारी असू शकते. लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर त्यांचा गोलंदाजीचा दृष्टिकोन संघासाठी प्रभावी शस्त्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा आधीच फिरकी विभागात चांगली कामगिरी करत आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर आधीच तिसरा फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात उपलब्ध आहे. शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिकलला फलंदाजीच्या क्रमांक ४ वर, आणखी एक संधी दिली जाऊ शकते.
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल बाहेर पडल्याने, संघाची धुरा ऋषभ पंतकडे देण्यात येऊ शकते. ऋषभ पंतचा आक्रमक दृष्टिकोन संघाला नवीन ऊर्जा देऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिकल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.