फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेचा काल म्हणेजच १३ नोव्हेंबर रोजी तिसरा T२० सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताच्या संघाने आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला पराभूत करून मालिकेत बरोबरी केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी कमाल करून दाखवली. भारताचा फलंदाज टिळक वर्माने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. तर अभिषेक शर्माने अर्धशतक ठोकले. त्याचबरोबर रमनदीप सिंह याला भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
#TeamIndia emerge victorious in a high-scoring thriller in Centurion 🙌
They take a 2⃣-1⃣ lead in the series with one final T20I remaining in the series 👏👏
Scorecard – https://t.co/JBwOUChxmG#SAvIND pic.twitter.com/StmJiqhI7q
— BCCI (@BCCI) November 13, 2024
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत २१९ धावा केल्या. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने दुसऱ्याच चेंडूवर त्याची विकेट गमावली. त्यानंतर त्याच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी टिळक वर्मा आला. यामध्ये टिळक वर्मा आणि अभिषेक शर्माने संघासाठी विस्फोटक फलंदाजी केली. यामध्ये अभिषेक शर्माने संघासाठी २५ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आणि त्याने त्याची विकेट गमावली. भारताचा युवा स्टार फलंदाज टिळक वर्माने संघासाठी पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टिळक वर्माने संघासाठी ५६ चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.
हेदेखील वाचा – पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड! मार्को जान्सनने काढली खुन्नस, दोन वेळा संजू सॅमसनला केलेयं त्रिफळाचित
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव संघासाठी फार मोठी कामगिरी करू शकला नाही. तो चार चेंडू खेळला आणि फक्त १ धाव करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी आला. हार्दिकने संघासाठी १६ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. त्यानंतर केशव महाराजने त्याची विकेट घेतली. भारतीय संघासाठी पदार्पण करणारा रमनदीप सिंहने संघासाठी ६ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या शेवटच्या चेंडूंमध्ये तो रनआऊट झाला.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर विश्वचषकातील स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने संघासाठी तीन विकेट नावावर केले. तर पुन्हा एकदा वरून चक्रवर्तीने संघासाठी त्याच्या फिरकीची जादू दाखवली आणि दोन विकेट नावावर केले. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्या हाती प्रत्येकी एक विकेट लागला.
भारताकडून टिळक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. टिळक वर्मा ५६ चेंडूत १०७ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार मारले. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने २५ चेंडूत ५० धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. टिळक वर्मा आंतरराष्ट्रीय T२० मध्ये शतक झळकावणारा १२वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ५६ चेंडूत १९१.०७ च्या स्ट्राईक रेटने १०७ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ शानदार षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेचा कोणताही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही आणि तो नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला.