मार्को जान्सनने काढली खुन्नस, दोन वेळा संजू सॅमसनला केलेयं त्रिफळाचित
Marco Jansson has beaten Sanju Samson twice : भारतीय विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी-20 सामन्यात एडन मार्करामने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. मार्को जान्सनच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट गेली. मार्को जान्सनने पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकनंतर स्पष्ट केले की, आम्ही टाॅस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजीच घेतली असती. प्रथम फलंदाजी टीम इंडियाच्या पथ्यावर पडणार असेच दिसत असतना, पहिल्याच चेंडूवरील विकेट टीम इंडियाला मोठा धक्का दिला.
संजूची पहिल्याच चेंडूवर विकेट
Sanju Samson couldn't let his Justice gang to go jobless so he scored back to back Ducks 🫡 pic.twitter.com/X79j5y2e9n
— Dinda Academy (@academy_dinda) November 13, 2024
मार्को जान्सन आणि संजूची जुंपली
मार्को जान्सन आणि संजूची पहिल्या मॅचमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. परंतु, या पहिल्या सामन्यानंतर लागोपाठ दोन सामन्यात मार्को जान्सने संजूला क्लिन बोल्ड केले आहे. यामागे एक खुन्नससुद्धा म्हणावी लागेल. संजूने पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी करीत शानदार शतकी खेळी केली होती.
भारतीय क्रिकेट संघाची पहिल्या सामन्यात कामगिरी
दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत टी-20 सामन्यात अफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. परंतुस सलामीवीर अभिषेक शर्मा लवकरच बाद झाला परंतु, दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनची जोरदार फटकेबाजी सुरुच होती. त्याने धमाकेदार फटकेबाजी करीत अवघ्या 50 चेंडूत 107 धावा ठोकल्या. त्याने उत्तुंग असे 10 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने शानदार शतक पूर्ण केले.
संजू सॅमसनची शानदार फटकेबाजी
भारताची पहिली विकेट लवकर गेल्यानंतरसुद्धा संजू सॅमसने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने मिडऑन, कव्हर, स्लीपला शानदार छक्के ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढला. संजू लागोपाठ दोन शतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया द. अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. टी-20 चा भारतीय संघ पूर्णपणे वेगळा आहे. संजू सॅमसनच्या फलंदाजीवर कायम शंका घेणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर आहे.
संजूने बांगलादेश विरुद्ध दसऱ्याची खेळी अविस्मरणीय
नवरात्रीच्या शेवटच्या रात्री म्हणजेच विजयादशमीला संजूने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करीत चाहत्यांना खूश केले. विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर जणू संजू दुर्गोत्सव करतोय असे भासत होते. त्याने बांगलादेश गोलंदाजांना चोपून काढले. एकाच ओव्हरमध्ये सलग पाच षटकार ठोकत बांगलादेशला हैराण करून सोडले.
संजू सॅमसनने लागोपाठ ठोकले दुसरे शतक
मागच्या महिन्यात नवरात्रीत, हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संजूने इतिहास रचला. बांगलादेशी गोलंदाजांना फोडून काढत राजीव गांधी स्टेडियमवर षटकारांची बरसात केली. नवरात्रीला जणू संजूमध्ये दुर्गा आलीये असेच वाटत होते. त्याने रिशाद हुसेनला मारलेले लागोपाठ 5 षटकार पाहण्याजोगे होते. काही केल्या बांगलादेशी गोलंदाजांना संजू ऐकत नव्हता. त्याने सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम स्वतःच्यानावावर केला.
युवराज सिंहचा विक्रम अबाधित
नवरात्रीत बांगलादेशी गोलंदाजांना धुवून काढत संजूने नवीन विक्रम आपल्या नावावर केला. संजू सॅमसनने आज अनेक रेकाॅर्ड केले तरी युवराज सिंहचा विक्रम अबाधित राहिला. एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम तसाच राहिला कारण संजूने पाच षटकार ठोकले, पहिला चेंडू ड्रॉ गेल्याने 5 चेंडू त्याने मैदानाबाहेर पाठवले. त्याने रिशादला मारलेले 5 षटकार देखण्याजोगे होते.