
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारताच्या गोलंदाजांची कौतुकास्पद कामगिरी कालच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार विकेट्स नावावर करुन विरोधी संघाला 275 धावांवर गुंडाळले. हे लक्ष्य भारताच्या संघाने 61 चेंडू शिल्लक असताना पुर्ण केले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाला नऊ विकेट्सने हरवले.
गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धुमाकूळ घातला. मात्र, सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय बनला. तिसऱ्या सामन्यात, कुलदीप यादवने पुन्हा एकदा मुख्य फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावली. त्याने १० षटकांत चार विकेट्स घेतल्या, ज्यात एक मेडन आणि ४१ धावा दिल्या होत्या. कुलदीपने संपूर्ण मालिकेत एकूण नऊ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर, सुनील गावस्कर यांनी कुलदीपला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
IND vs SA : मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीरने साधला मिडियावर निशाणा, प्रेस कॉन्फरन्समध्ये काढला राग
सामन्यानंतर कुलदीप यादव स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता. सुनील गावस्कर यांनी कुलदीप यादवला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न केला. सुनील गावस्करने कुलदीपला विचारले, ” अरे कानपुरिया, तू कधी लग्न करणार आहेस ते सांग?” या प्रश्नावर कुलदीप सुरुवातीला लाजला. नंतर हसत तो म्हणाला, “पुढच्या वर्षी होईल.” तथापि, त्याने पुढच्या वर्षी कोणत्या महिन्यात लग्न करणार हे सांगितले नाही.
४ जून रोजी लखनौ येथे झालेल्या एका समारंभात कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी लग्न केले. त्याने सोशल मिडियावर फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती शेअर केली होती आयपीएल उशिरा संपल्यामुळे, २९ जून रोजी होणारा विवाह पुढे ढकलावा लागला. त्यानंतर बातमी आली की तो या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहे.
कसोटी मालिकेदरम्यान, कुलदीपने बीसीसीआयला पत्र लिहून त्याच्या लग्नासाठी सुट्टी मागितल्याची बातमी समोर आली. तथापि, कसोटी मालिकेनंतर तो एकदिवसीय मालिकेत व्यस्त झाला. ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे लग्न कधी होईल हा प्रश्न कायम आहे.