
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South africa 1st ODI Toss Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना आज रांची येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतासाठी फार महत्वाचा असणार आहे. कसोटी मालिकेच्या पराभवानंतर टीम इंडिया या मालिकेमध्ये विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद हे या मालिकेमध्ये केएल राहुलकडे असणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद हे एडन मारक्रमकडे असणार आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे. या सामन्यामध्ये नाणेफेक दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो खेळणार नाही. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली याचे संघामध्ये पुनरागमन करणार आहेत. या सामन्यामध्ये भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह या संघाचा भाग नाही.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first. Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yjLCRSzARZ — BCCI (@BCCI) November 30, 2025
टीम इंडियाने या सामन्यामध्ये काही बदल केले आहेत. भारताच्या संघाने कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे टीम इंडियाकडून या सामन्यामध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताच्या संघाने संघामध्ये रुतुराज गायकवाड याला स्थान दिले आहे. मागील अनेक महिन्यांपासून भारताच्या संघामध्ये रुतुराज गायकवाड याला संघामध्ये स्थान मिळाले नव्हते त्यामुळे आता त्याचे पुन्हा भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मुख्य कर्णधार टेम्बा बवुमा हा सामना खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा भारतामध्ये खेळताना दिसणार आहे. आजचा सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमन