
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Shubman Gill Comeback : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरुवातीला दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली तर पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापतीमुळे संघ सोडावा लागला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेमध्ये देखील त्याला दुखापतीमुळे बाहेर राहावे लागले होते. आता पुढील टी20 मालिकेमध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे अशी वृतांची माहिती होती. पण आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यान शुभमन गिलला दुखापत झाली होती.
पहिल्या कसोटी सामन्यात त्याला मानदुखीचा त्रास झाला आणि तो मालिकेतून बाहेर पडला. त्याला एकदिवसीय मालिकेसाठीही निवडण्यात आले नाही आणि केएल राहुलने संघाची सूत्रे हाती घेतली. आता, शुभमन गिल त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि लवकरच तो टीम इंडियाच्या जर्सीवर परतण्याची अपेक्षा आहे. तो ९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात खेळताना दिसू शकतो.
शुभमन गिलला मानेचा तीव्र त्रास होत होता आणि त्यामुळे तो फलंदाजी करू शकत नव्हता. डॉक्टरांनी त्याला विमानात न बसण्याचा सल्ला दिला. मुंबईत त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन झाले. काही दिवसांपूर्वी शुभमन गिल बरे होण्यासाठी बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला होता. टी-२० मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी आशा होती. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला टीम इंडियाच्या संघात समाविष्ट करण्यात आले. आता, गिल पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि मैदानात परतण्यास तयार आहे अशा बातम्या येत आहेत.
🚨 GOOD NEWS FOR INDIA 🚨 – Shubman Gill has been declared fit for the entire T20I series against South Africa. [RevSportz] pic.twitter.com/5BU6AuiCjS — Johns. (@CricCrazyJohns) December 6, 2025
शुभमन गिलला आता खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्याला मैदानापासून दूर ठेवण्यात काही अर्थ नाही. पहिला टी-२० सामना ९ डिसेंबर रोजी कटकमध्ये होणार आहे आणि शुभमन गिल या सामन्यात खेळू शकतो. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करतो. आता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पुनरागमन करून, तो खूप धावा करू शकतो आणि टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सनद, हरदीप सनद, यष्टिरक्षक, यष्टिरक्षक, यष्टिरक्षक, सुर्यकुमार यादव.