
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs South Africa First Session : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा कसोटी सामना हा गुवाहाटीच्या मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा आहे, याचे कारण म्हणजेच भारताच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यामुळे मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. आजच्या सामन्यामध्ये आता पहिला सेशन पार पडला आहे यामध्ये भारताच्या संघाच्या हाती एकही विकेट लागली नाही. या पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी त्याची मजबूत पकड ठेवली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सेशनचा खेळ संपला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावामध्ये फक्त १ विकेट गमावला आहे. पहिल्या सत्रात एक विकेट गमावून ८२ धावा केल्या. एडेन मार्करामला जसप्रीत बुमराहने ३८ धावांवर बाद केले. दक्षिण आफ्रिकेने संघात एक बदल केला आहे. कॉर्बिन बोसची जागा सेनुरन मुथुस्वामीने घेतली आहे. भारतातही दोन बदल झाले आहेत.
.@Jaspritbumrah93 strikes ⚡️ He picks up Aiden Markram on the stroke of Tea on Day 1 👏👏 Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/t6Uih6yWto — BCCI (@BCCI) November 22, 2025
शुभमन गिलची जागा नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेलची जागा साई सुदर्शनने घेतली आहे. गुवाहाटीचे बरसापारा क्रिकेट स्टेडियम पहिल्यांदाच कसोटी सामना आयोजित करत आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघ मालिका १-१ अशी बरोबरी करण्याचे लक्ष्य ठेवेल. शुभमन गिल फिट नाही. अशा परिस्थितीत, ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. पहिल्यांदाच तो अधिकृतपणे कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
या मालिकेनंतर भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये पुन्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतीय एकदिवसीय संघामध्ये पुनरागमन करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर या दोन संघामध्ये टी20 मालिकेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकेला सुरुवात ही 30 नोव्हेंबरपासून होणार आहे. या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत तर टी20 मालिकेची सुरुवात ही 9 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.