
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs South Africa Match Score : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोना सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली विशेषत: भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. हा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताला १२४ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. जर भारताला मालिकेत १-० अशी आघाडी घ्यायची असेल तर त्यांना इतिहास रचावा लागेल. खरं तर, ईडन गार्डन्सवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत ११७ पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांपर्यंत मर्यादित राहिला. टेम्बा बावुमा ५५ धावा काढल्यानंतर शेवटपर्यंत नाबाद राहिला. तिसऱ्या दिवशी भारताकडून मोहम्मद सिराजने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला. या डावाचा हिरो रवींद्र जडेजा होता, ज्याने चार बळी घेतले. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात १५९ धावांवर ऑलआउट झाली, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने १८९ धावा केल्या.
Innings Break! 4⃣ wickets for Ravindra Jadeja
2⃣ wickets each for Kuldeep Yadav and Mohd. Siraj
1⃣ wicket each for Axar Patel and Jasprit Bumrah#TeamIndia have been set a target of 1⃣2⃣4⃣ runs to win the 1⃣st Test 🎯 Scorecard ▶️https://t.co/okTBo3q069 #INDvSA |… pic.twitter.com/xPxfeT8urM — BCCI (@BCCI) November 16, 2025
भारताच्या संघासाठी या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला तर त्याचा पुढील सामन्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. हा लेख लिहीपर्यत भारताच्या संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालचा विकेट गमावला. त्याचबरोबर केएल राहुल देखील बाद झाला आहे. भारताच्या संघाला पहिले दोन मोठे धक्के बसले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार टेम्बा बवुमा यानेच फक्त अर्धशतक झळकावले त्याव्यतिरिक्त कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. इडन गार्डन्सच्या मैदानावर आतापर्यत 117 धावांचे लक्ष पार केले आहे त्यामुळे भारताच्या संघाने 123 धावांचे लक्ष पार केले तर इतिहास रचला जाईल. रविंद्र जडेजा याने संघासाठी चार विकेट्स घेतले तर मोहम्मद सिराज याने संघासाठी शेवटचे दोन विकेट्स मिळवून दिले. कुलदिप यादवच्या हाती देखील 2 विकेट्स लागले. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी संघाला प्रत्येकी १ विकेट मिळवून दिला.