
Ind vs SA Test: "I am the captain, don't teach me", former cricketer Srikkanth's response to Gautam Gambhir's criticism
हेही वाचा : लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक?
चीकी चीकी या त्याच्या यूट्यूब शोमध्ये, श्रीकांत यांनी संघ निवडीबद्दल बोलताना गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीकांत म्हणाले की, म्हणाले की अक्षर पटेलची अनुपस्थिती आश्चर्यकारक अशीच होती. त्यांनी टिप्पणी करत म्हटले आहे की, “अक्षर पटेल का खेळत नाहीये? तो अनफिट आहे का? तो सातत्याने प्रत्येक पातळीवर चांगली कामगिरी करत असून इतके छाटणी आणि प्रयोग का?” श्रीकांत यांनी संघ व्यवस्थापनावर सतत बदल केल्याचा आरोप देखील केल आहे. त्यांनी म्हटले आहे की, यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास अडचण निर्माण होते.
गौतम गंभीरवर टीका करताना श्रीकांत यांनी म्हटले आहे की, भारतीय संघ प्रत्येक दुसऱ्या सामन्यात एका खेळाडूला पदार्पण देत आहे, जे स्पष्टपणे चाचणी आणि त्रुटीसारखे दिसून येत आहे. श्रीकांत म्हणाले की “गौतम गंभीर काहीही बोलो, मला काही फरक पडत नाही. मी कर्णधार आणि निवड समितीचा अध्यक्ष राहिलो आहे. मला माहिती आहे मी काय बोलत आहे.” श्रीकांत यांनी गंभीरच्या सततच्या प्रयोगांना संघाच्या अस्थिरतेचे एक प्रमुख कारण म्हटले आहे.
श्रीकांत यांनी भारतीय फलंदाजीचे वर्णन देखील अस्थिर असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याने विशेषतः कर्णधार ऋषभ पंतचे शॉट्स बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. श्रीकांत यांनी म्हटले आहे की, “हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे, पण तो कर्णधार आहे. तो सामन्याची परिस्थिती पाहत नव्हता का?”
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम