
IND vs SA 4th T20I: The fourth T20 match affected by fog! The match between South Africa and India has finally been cancelled.
IND vs SA 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, हा सामना ठरलेल्या वेळेवर खेळवण्या येऊ शकला नाही धुक्यामुळे सामन्याची वेळ पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द करण्यामागील मुख्य कारण म्हणजे लखनौमध्ये पसरलेले दाट धुके, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि अखेर पंचांना हा सामना रद्द करावा लागला.
पंच तपासणीसाठी मैदानात आल्यावर चाहते सामन्याच्या आशेने वाट पाहत असल्याचे दिसत होते. त्यांनी फलंदाजाच्या क्रीझवरून फ्लडलाइट्सची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला आहे. हे अपरिहार्य होते, कारण दृश्यमानता सुधारण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
हेही वाचा : IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर
सध्या उत्तर भारतात हिवाळ्याचे मोठे परिणाम दिसू लागेल आहेत. त्याला आता लखनौ हे शहर देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. १७ डिसेंबर रोजी लखनौमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आधीच धुक्याचा इशारा जारी करण्यात आला होता, ज्याचा आता सामन्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अखेर आता सामना रद्द करण्यात आला.
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: The fourth India-South Africa T20I is called off due to excessive fog.#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QWDUVFxVlP — BCCI (@BCCI) December 17, 2025
वाचा दोन्ही संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
दक्षिण आफ्रिकाः एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेड्रिक्स, देवाल्ड बुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, माकों जानसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे.