शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill is out of the fourth T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना लखनौ येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा T20I संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. मालिकेतील महत्त्वाच्या टप्प्यावर गिलची अनुपस्थिती संघ व्यवस्थापनासाठी अडचणीचे कारण बनले आहे.
टी20I स्वरूपात पुनरागमन केल्यानंतर शुभमन गिल भारताचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हापासून, तो सातत्याने प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला आहे, परंतु त्याची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20I आधी तो खेळेल अशी अपेक्षा असताना त्याला पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. दुखापतीच्या तीव्रतेबद्दल बीसीसीआयने अद्याप काही एक अधिकृत माहिती दिलेली नाही.
टी-२० विश्वचषकापूर्वी शुभमन गिलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचे सातत्याने धावा न काढने त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास मदत करत आहेत. या टप्प्यावर, दुखापतीमुळे सामन्यांमधून त्याची अनुपस्थिती त्याला पुन्हा फॉर्म मिळवणे आणखी कठीण बनवू शकते असे बोलले जात आहे. जर दुखापत अधिक गंभीर असेल तर गिल अंतिम टी-२० सामना देखील खेळण्याची शक्यता कमीच आहे.
शुभमन गिलच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सलामीवीरांच्या संयोजनावर आता अधिक विचार करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, संजू सॅमसनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता बळवली आहे. सॅमसनने यापूर्वी संघासाठी टॉप ऑर्डरमध्ये सलामी किंवा फलंदाजी केली असून त्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी असणार आहे.
हेही वाचा : Ashes series 2025 : शतकासाठी अॅलेक्स कॅरीचा ‘फ्रॉड’ गेम? VIDEO व्हायरल होताच ‘ती’ चूक समोर; चाहते ‘सदम्यात’
वाचा भारतीय संघाचा अपडेटेड स्क्वॉड
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
दक्षिण आफ्रिकाः एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेड्रिक्स, देवाल्ड बुविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, माकों जानसेन, लुथो सिपामला, ओटनील बार्टमन, अॅरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि जॉर्ज लिंडे.






