
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारताच्या संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडियाने मागील सामन्यांमध्ये खराब फलंदाजी केली होती त्यामुळे आज भारतीय फलंदाजांवर चाहत्यांची नजर असणार आहे. मागील सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली होती त्यामुळे आज दुसऱ्या सामन्यामध्ये तो संघाबाहेर असणार आहे. त्याचबरोबर आज या दुसऱ्या सामन्याचे कर्णधारपद हे रिषभ पंत सांभाळताना दिसणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे कारण टीम इंडियाला या मालिकेमध्ये विजय मिळवण्याची संधी नाही पण मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. गुवाहाटी येथे हा पहिला सामना मैदानावर खेळवला जात आहे. त्यामुळे आज भारताचा संघ कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bowl first Updates ▶️ https://t.co/GYLslRzj4G#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Q0xOYFQEuj — BCCI (@BCCI) November 22, 2025
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सामना सुरु होणार आहे या सामन्यामध्ये भारताचा मुख्य कर्णधार शुभमन गिल याने संघ सोडला आहे त्यामुळे आज तो हा सामना खेळणार नाही तर त्याच्या जागेवर नितिश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल याला देखील प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही पण त्याच्या जागेवर साई सुदर्शन याला स्थान मिळाले आहे.
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर आणि केशव महाराज
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज