गॉल स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी, गॉलच्या नेहमीच्या खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. चेंडू अपेक्षेप्रमाणे जास्त फिरणार नाही. या मैदानावर शेवटच्या तीन दिवसांपेक्षा पहिल्या दोन दिवसांत फलंदाजी करणे सोपे जाईल. जर हवामान ढगाळ राहिले, तर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करू शकते.
भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण ४६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघाने २२ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ७ वेळा विजय मिळवला आहे. या दोन संघांमधील १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने श्रीलंकेला मायदेशात नऊ वेळा पराभूत केले आहे, तर श्रीलंकेने घरच्या मैदानातील सर्व सातही सामने जिंकले आहेत.
श्रीलंकेचा संघ: धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उप-कर्णधार), दिनेश चांदिमल, पसिंदू सूरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशर नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का
भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान
IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल

