फोटो सौजन्य - AsianCricketCouncil
भारत विरुद्ध श्रीलंका सामना : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज सुपर 4 चा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी सराव सामना असणार आहे. श्रीलंकेच्या संघाने साखळी सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती पण सुपर 4 मध्ये त्यांना कोणत्याही सामन्यामध्ये विजय मिळवता आला नाही. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यामध्य त्यांना बांग्लादेशने हरवले होते तर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पाकिस्तानच्या संघाने पराभूत केले होते.
भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही. साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएई, पाकिस्तान आणि ओमान या देशांना पराभुत करुन धूमाकुळ घातला. सुपर 4 मध्ये भारताचा हा शेवटचा सामना आहे. या सुपर 4 च्या शर्यतीत भारताच्या संघाचे दोन सामने झाले यामध्ये पहिला सामना हा पाकिस्तानविरुद्ध झाला होता तर दुसरा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळवण्यात आला. या दोन्ही संघाना भारताच्या संघाने पराभुत करुन एक सामना होण्याआधीच फायनलचे स्थान पक्के केले आहे.
भारतीय संघ रविवारी १२ वा आशिया कप फायनल खेळेल आणि त्याआधी शुक्रवारी सुपर ४ टप्प्यातील अंतिम सामन्यात त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल. श्रीलंका आधीच अंतिम शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि हा सामना फक्त औपचारिकता आहे, परंतु अंतिम सामन्यापूर्वी आपल्या उणीवा दूर करण्याची ही भारताची शेवटची संधी असेल.
आता संघाला प्रयोगांची रणनीती सोडून स्थिर संयोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ओमानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अनेक बदल करण्यात आले, ज्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला तरी विजय मिळाला. त्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला आला नाही. त्याचप्रमाणे बांगलादेशविरुद्ध संघाने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, परंतु तो तीन चेंडूत फक्त दोन धावा काढल्यानंतर बाद झाला. स्टार फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. आता भारताला प्रयोग करण्याऐवजी मजबूत संयोजन मैदानात उतरवावे लागेल.
India strives for absolute domination as Sri Lanka looks to salvage some pride ⚔️🤩 Watch #INDvSL Live tonight, 7 PM onwards on the Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/0xwbU7MrDS — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 26, 2025
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, जेनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्सेरा, नुवानिडू फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, महेश थेकसेना, जैनिथ लियानागे, तुषारा, माथेशा पाथीराणा.