Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA, T20 World Cup 2026 : सूर्या आर्मी सुपर 8 मध्येही विजयीरथ कायम ठेवणार? दक्षिण आफ्रिका आणि भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ आता सुपर ८ सामने सुरू होणार आहेत. सुपर ८ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. या संघातील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 04:12 PM
IND vs SA, T20 World Cup 2026: Will Surya Army continue its winning streak in Super 8s? Such a head-to-head record against South Africa

IND vs SA, T20 World Cup 2026: Will Surya Army continue its winning streak in Super 8s? Such a head-to-head record against South Africa

Follow Us
Close
Follow Us:

India vs South Africa head-to-head record, T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या  साखळी सामन्यात भारतीय संघाने अपराजित राहून दिमाखात सुपर एटमध्ये एंट्री केली आहे. आता टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे.

हेही वाचा : ZIM vs SL, T20 World Cup : विश्वचषकातील सर्वोत्तम झेल पाहिलात का? दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर उडी घेत टिपला अद्भुत झेल; पाहा VIDEO

२२ फेब्रुवारी रोजी रंगणार मोठा सामना

सुपर ८ मधील भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारताने मागील हंगामातील त्यांचा शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता, त्यामुळे घरच्या परिस्थितीचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाने देखील आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत प्रभावी कामगिरी बजावली आहे.दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि आत्मविश्वासाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला.

या संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा आहे?

दोन्ही संघांमधील २० षटकांच्या स्वरूपातील सामने नेहमीच रोमांचक स्थितीत जाऊन पोहचले आहेत. भारताने क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात चांगलेच वर्चस्व गाजवले आहे. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेने अनेक वेळा मजबूत आव्हान उभे केले आहे. मागील रेकॉर्ड बघता विश्वचषक सामन्यांमध्ये भारताची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे, परंतु मोठ्या मंचावरील प्रत्येक सामना नवीन इतिहास रचत असतो, त्यामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगला खेळ करावा लागणार आहे.

या सामन्याचा निकाल हा दोन्ही संघांची भविष्यातील रणनीती कशी आहे यावर ठरणार आहे. विजयी संघाला अंतिम चारमध्ये जाण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो, तर पराभूत संघाला आगामी सामन्यांमध्ये वाढत्या दबावाचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा : AUS vs OMA : विश्वचषकाचा शेवटचा लीग सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या Live Streaming ची सविस्तर माहिती

दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ यांच्यात एकूण आंतरराष्ट्रीय सामने ३५ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने  २१ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेला १३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामाना रद्द झाला आहे. तसेच या संघांमध्ये एकूण ७ टी२० विश्वचषक सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये देखील भारताने आपला दबदबा राखला आहे. भारताने या स्पर्धेत ५ सामन्यात विजय मिलवलय आहे. तर दक्षिण आफ्रिकेने २ सामने आपल्या खिशात टाकले आहेत.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, जेसन स्मिथ, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश, जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन स्टब्स, क्वेना मफाका.

भारत :  इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

Web Title: Ind vs sl south africa and indias head to head record in t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.