दासुन शनाकाने एका संस्मरणीय झेल(फोटो-सोशल मीडिया)
Dasun Shankar’s best catch of T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी२० विश्वचषकात अनेक वेळा क्षेत्ररक्षण करताना खेळाडू आपले लक्ष वेधून घेतात. यामध्ये काही झेल असे असतात की, ते आपले मन देखील जिंकतात. २०२६ च्या टी२० विश्वचषकात असाच एक झेल बघायला मिळाला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दासुन शनाकाने एका संस्मरणीय झेल घेऊन चांगलीच प्रसिद्धी मिळवली. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात १९ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने श्रीलंकेचा पराभव करून मोठा अपसेट केला, परंतु शनाकाच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.
झिम्बाब्वेला शेवटच्या १२ चेंडूत १३ धावांची आवश्यकता होती. तेव्हा सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट क्रीजवर उपस्थित होते. १९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रझा बाद माघारी गेला. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ताशिंगा मुसेकिवाने एक शक्तिशाली शॉट टोलवला आणि चेंडू सीमारेषेकडे जाऊ लागला होता, त्यानंतर शनाका विरुद्ध दिशेने सुमारे २५ मीटर धावला. आणखी एक खेळाडूही झेल घेण्यासाठी येत होता, पण शनाकाने त्याला थांबण्याचा इशारा केला आणि तो अफलातून झेल घेतला. हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
एकाच षटकात दोन विकेट पडल्याने सामन्याचा निकाल श्रीलंकेच्या बाजूने लागेल असे वाटत होते. तथापि, शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला ८ धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक एकर आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून झिम्बाब्वेने सामना आपल्या खिशात टाकला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, झिम्बाब्वेने दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मुरुमानी यांनी ५५ धावांची भागीदारी केली. मुरुमानी ३४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन बर्लने २३ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास
ब्रायन बेनेटने महत्त्वपूर्ण ६० धावा केल्या, तर सिकंदर रझाने २६ चेंडूत ४५ धावा करून संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. या प्रभावी खेळींमुळे झिम्बाब्वेला स्पर्धेतील आणखी एक मोठा अपसेट मिळाला.






