फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टीम इंडियाच्या होम ग्राउंडवर दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये सहज विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या डावामध्ये 518 धावा केल्या होत्या. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्याची पहिली इनिंग संपली आहे. 518 धावा केल्या होत्या. 518 धावा नंतर भारताच्या संघाने डाव घोषित केला होता. पहिल्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजच्या संघाला 248 धावांवर टीम इंडियाने रोखले.
यामध्ये भारतीय संघांची कमालीची कामगिरी राहिली, यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी पाच विकेट्स घेतले तर रवींद्र जडेजा याने तीन विकेट्स घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने यांनी दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. वेस्ट इंडिजच्या संघाने या सामन्यामध्ये काही चांगली भागिदारी केली. पण एकही फलंदाज मोठी धावसंख्या करु शकला नाही.
5⃣-fer x 5⃣ times Kuldeep Yadav gets his fifth five-wicket haul in Tests! 👏 A wonderful performance from him yet again 🔝 Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @imkuldeep18 pic.twitter.com/BUhPgnIVt6 — BCCI (@BCCI) October 12, 2025
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप यादव शानदार गोलंदाजी करत आहे. हा त्याचा फक्त १५ वा कसोटी सामना आहे, तर टीम इंडियासाठी पदार्पण करून त्याला आठ ते नऊ वर्षे झाली आहेत. अनेकदा असे दिसून आले आहे की कुलदीपची टीम इंडियाच्या संघात निवड होते पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाही. यापूर्वी, इंग्लंड दौऱ्यावर, टीम इंडियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील कोणत्याही सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.
अनिल कुंबळे म्हणाले, “कुलदीप यादव पदार्पणापासून ८-९ वर्षांत केवळ १५ वा कसोटी सामना खेळत आहे हे दुर्दैवी आहे.” या मालिकेपूर्वी कुलदीपने टीम इंडियासाठी फक्त १३ कसोटी सामने खेळले होते. माजी क्रिकेटपटूंनी याबाबत संघ व्यवस्थापनाला वारंवार प्रश्न विचारले आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. अहमदाबाद कसोटीत कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीत गोलंदाजी करताना कुलदीप यादवने प्रत्येक डावात दोन असे एकूण चार विकेट्स घेतल्या. दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात कुलदीपने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.