
Ind vs zim : वैष्णवी शर्माचा 'पंच'; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बॉब्वेला 131 धावांत गुंडाळलं, 'क्लीन स्वीप' करण्याचा मार्ग मोकळा
झिम्बॉब्वेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीची मॉडेस्टर मुपाचिकवा (37) आणि कर्णधार जोसेफीन नमकोवो (35) वगळता त्यांचा कोणताच फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. वैष्णवी शर्माने त्यांना मनमोकळेपणाने खेळूच दिलं नाही.
सायली सतघरेने लॉर्यन फिरीला भोपळाही फोडू न देता झिम्बॉब्वेला पहिला धक्का दिला. त्यानंतर क्रांती गोडने आक्रमक चिपो तिरिपानो (4)ला शेफाली करवी झेलबाद करत झिम्बॉब्वेची अवस्था 2 बाद 12 धावा अशी केली.
त्यानंतर हाकेच्या अंतरावर बिल्वड बिझा (1) वैष्णवी शर्माचा पहिला शिकार ठरली. तर 7 चौकार ठोकत खेळपट्टीवर टिकलेल्या मोडेस्टरला वैष्णवीने जास्त आक्रमक होऊ दिलं नाही. चेडझा धुरूरू (20)ने काही काळ नमकोवोसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही वैष्णवीने जिंतामनी कलिताकरवी झेलबाद केले.
तसेच मिशेल मुवांगा चौथी (6), तर नायशा ग्वानझुरू (10) वैष्णवीची पाचवी शिकार ठरली. वैष्णवीने 10 षटकात 39 धावा देत पाच विकेट मिळवण्याची किमया केली.
IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
भारताने वडोदरा येथ पार पडलेल्या मालिकेतील पहिला सामना 9 विकेटने, तर दुसरा सामना 121 धावांनी जिंकत मालिका अगोदरच आपल्या नावे केली होती. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात पराभूत करत झिम्बॉब्वेला क्लीन स्वीप करण्याची नामी संधी भारतीय संघाकडे आहे.
वैष्णवीनंतर क्रांती गौड व सायली सतघरेने प्रत्येकी 2, तर दीप्ति शर्माने एक विकेट्स घेतली.
ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?