ICC Fined Pakistan Bowler Haris rauf
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रउफला आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी आयसीसीने त्याच्या सामना शुल्काच्या २०% दंड ठोठावला आहे. रउफने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. जे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या वर्तनाशी संबंधित आहे. हरिसचा एक डिमेरिट पॉइंटही कमी करण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील हे त्याचे तिसरे उल्लंघन असून, त्यामुळे त्याच्या एकूण उल्लंघनांची संख्या पाच झाली आहे.
पाकिस्तानच्या डावाच्या ४६ व्या षटकादरम्यान, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या हरिस रउफने वाईडचे अपील केले. त्यानंतर त्याचा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्ससोबत वाद झाला. पंच शरफुद-उद-दौला इब्ने शाहिद यांनी इशारा देऊनही रउफने आपली बॅट उंचावली आणि वाद सुरूच ठेवला. त्यानंतर तो पंचांपासून बाजूला होऊन जॅक्सच्या दिशेने गेला. या वर्तनाबद्दल त्याच्या सामना शुल्कातून २०% कपात करण्यात आली आणि त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला.
सामन्यादरम्यान इंग्लंड संघाकडूनही एक मोठी चूक झाली. ज्यामुळे त्यांना सामना शुल्काचा दंड भरावा लागला. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, जर एखादा संघ निर्धारित वेळेत आपली ठरलेली षटके पूर्ण करू शकला नाही, तर प्रत्येक षटकासाठी दंड आकारला जातो. इंग्लंड संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागे होता, त्यामुळे त्यांना १५% दंड आकारण्यात आला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने आपली चूक कबूल केली, आणि त्यामुळे आता कोणतीही सुनावणी होणार नाही.
२५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने १५४ धावांत ९ विकेट्स गमावले होते. इंग्लंडचा विजय निश्चित होता, पण शादाब खानने एक शानदार खेळी केली. त्याने नाबाद ११३ धावा करून आपल्या संघाला फक्त १ विकेट राखून विजय मिळवून दिला.
IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर






