
IND W vs AUS W Semi Final Live: In the India-Australia match, players of both the federations got black stripes; What is the reason?
India-Australia players tied black belts : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना खेळला जात आहे. नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे, जिथे दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियन क्लब क्रिकेटर बेन ऑस्टिनला श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. मंगळवारी मेलबर्नच्या आऊटर ईस्टमधील फर्न्ट्री गली येथे सराव सत्रादरम्यान १७ वर्षीय बेनला दुखापत झाली होती. तो टी२० सामन्याची तयारी करत असताना त्याच्या मानेवर साइडआर्मचा चेंडू लागला. त्यावेळी ऑस्टिनने हेल्मेट घातले होते, परंतु त्यात स्टीम गार्ड नव्हते. या दुखपतीत त्याचा बुधवारी मृत्यू झाला.
अॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट आणि इंटेन्सिव्ह केअर पॅरामेडिक्सने बेनला मोनाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र खूप उशीर झाला होता. बुधवारी बेनची प्राणज्योत मालवली. फर्न्ट्री गली क्रिकेट क्लबकडून गुरुवारी बेनच्या निधनाची घोषणा करण्यात आली. फर्न्ट्री गली क्रिकेट क्लबने शोक व्यक्त करताना म्हटले की, “बेनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले असून याचा परिणाम आमच्या क्रिकेट समुदायातील प्रत्येकावर होईल. आमचे विचार आणि प्रार्थना त्याच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि बेनला ओळखणाऱ्या सर्वांसोबत आहेत.” असे म्हटले.
सामन्याची स्थिती
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. २५ धावा झाल्या असताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. कर्णधार अॅलिसा हिली ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर मात्र फोबे लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघींनी ही बातमी करत असेपर्यंत १२५ धावांची भागीदारी केली आहे. फोबे लिचफिल्ड ९३ धावांवर खेळत आहे तर एलिस पेरी ३९ धावांवर खेळत आहे. भारताकडून क्रांति गौडने एक विकेट घेतली आहे. ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत आहे. संघाने २२ ओव्हरमध्ये १ विकेट गमावून १४९ धावा केल्या आहेत.
हेही वाचा : shreyas iyer health update : ‘मी लवकरच मैदानावर…’ श्रेयस अय्यरने तब्बेतीबाबत स्वतः च दिली माहिती
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.