भारत आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना(फोटो-सोशल मीडिया)
Reserve day provision for India vs Australia semi-final : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामना खेळला जात आहे. हा सामना नवी मुंबईत येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार पाऊस पडत आहे. एक वेळ हा सामाना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. याआधी नवी मुंबईत भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम गट सामना पावसामुळे वाया गेला होता. जर उपांत्य सामन्यादरम्यान पाऊस पडला तर तो रद्द केला जाणार नाही कारण त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. जर पावसामुळे सामना राखीव दिवशी हलवण्यात आला तर नेमकी काय परिस्थिती असणार आहे?हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : shreyas iyer health update : ‘मी लवकरच मैदानावर…’ श्रेयस अय्यरने तब्बेतीबाबत स्वतः च दिली माहिती
प्रथम, नवी मुंबई येथे डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर सामना दुपारी ३ वाजता सुरू झाला आहे. AccuWeather.com नुसार, नवी मुंबईतील दुपारच्या हवामानामुळे पावसाची शक्यता ३०-३५ टक्के इतकी आहे. याचा अर्थ पाऊस सामन्यात व्यत्यय आणू शकतो. तथापि, त्या पावसामुळे सामना राखीव दिवसापर्यंत जाण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवण्यात येतआहे. म्हणजेच, जास्तीत जास्त सामना उशिरा होऊ शकतो आणि काही षटके कमी देखील होऊ शकतात.
नवी मुंबई येथील हवामान कधी देखील बिघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचे काय होईल? तर सामना राखीव दिवशी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, राखीव दिवशीचा सामना ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरू करण्यात येईल.
हेही वाचा : IND W vs AUS W Semi Final Live : ऑस्ट्रेलियाचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय; भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा
हे असे दोन्ही प्रकरणांमध्ये घडू शकेल. उदाहरणार्थ, जर सामना पूर्ण ५० षटकांचा असेल, तर तो ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा खेळ सुरू करण्यात येईल. शिवाय, जर सामन्याच्या दिवशी पावसामुळे षटकांमध्ये कपात करण्यात आली. तर, तो ठरलेल्या दिवशी जिथे थांबवला होता तिथून पुन्हा सुरू होणार. जर तो सामना ४६-४६ षटकांचा खेळला गेला, तर राखीव दिवशी देखील तो ४६ षटकांचा सामना होणार आणि राखीव दिवशी तो जिथे थांबवण्यात आला होता तिथूनच सुरू करण्यात येईल.






