फोटो सौजन्य - BCCI Women
हरमनप्रीत कौरचे शतक : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. सध्या भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा हा मालिकेचा सामना सुरू आहे या मालिकेआधी एक सामना भारताच्या संघाने जिंकला आहे तर दुसरा सामना हा इंग्लंडने जिंकला होता. तिसरा सामना हा काउंटिंग क्रिकेट मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारताच्या संघाने दमदार सुरुवात करून पहिले फलंदाजी करत कमालीची खेळी दाखवली आहे. यामध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे मोलाचे योगदान राहिले.
IND vs PAK : 2028 च्या ऑलिम्पिकमध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही! उघड झाले मोठे कारण
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने शतक झळकावले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 वा एकदिवसीय सामना खेळणारी जेमिमा रॉड्रिक्सने अर्धशतक झळकावले. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने शतक झळकावले. हरमनप्रीत कौरने 84 चेंडूमध्ये 102 धावा केल्या. यामध्ये तिने 14 चौकार मारले. आजच्या सामन्यात कर्णधाराने 121 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
HUNDRED!
Century number 7⃣ in ODIs for Captain Harmanpreet Kaur 🫡
Leading from the front and how 🔥
Updates ▶️ https://t.co/8sa2H24aBL#TeamIndia | #ENGvIND | @ImHarmanpreet pic.twitter.com/EKnUtVI1jt
— BCCI Women (@BCCIWomen) July 22, 2025
हरमनप्रीत कौर हिने तिच्या करिअरचे सातवे शतक झळकावले. हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक शतके ही इंग्लंड विरुद्ध मारले आहेत. तिने इंग्लंड विरुद्ध तीन शतके झळकावली आहेत. 2025 मध्ये भारतामध्ये एक दिवसीय महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हनुमानप्रीत कौर हीच विश्वचषकाच्या वेळी वेळेवर फॉर्म मध्ये येणे हे भारतीय संघाचे नक्कीच फायदेशीर ठरेल. 2025 मध्ये तिने एकही अर्धशतक या शतक नावावर केले नव्हते. खरा फॉर्मशी मागील बरेच महिने ते झुंजत होती.
भारतीय संघासाठी तिसऱ्या सामन्यांमध्ये जेमिमा रॉड्रिक्स हिने अर्धशतक झळकावले. तिने 45 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या यामध्ये सात चौकार मारले. तिसरा सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय हा संघाला चांगलाच फायदेशीर ठरला आहे पहिले फलंदाजी करत भारताच्या संघाने पाच विकेट्स गमावून पन्नास ओव्हर मध्ये 318 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्यात भारताच्या संघाने चार फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आज भारताच्या संघाने राधा यादवला देखील प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळाली आहे.