Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W: अंतिम सामना मोफत पाहायचा? असा करा जुगाड; कधी, कुठे आणि कसा? वाचा सविस्तर 

आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टार आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 01, 2025 | 05:51 PM
IND W vs SA W: Want to watch the final match for free? Play this Jugaad; When, where and how? Read in detail

IND W vs SA W: Want to watch the final match for free? Play this Jugaad; When, where and how? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने 
  • भारत तिसऱ्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 
  • अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टार आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार 

IND W vs SA W, ICC Women’s ODI World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह, भारतीय संघ तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. भारतीय संघाने अद्याप विश्वचषकावर नाव कोरलेले नाही.  यावेळी मात्र भारत दक्षिण आफ्रिकेला हरवून प्रथमच जेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.

अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारून भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे आता सर्व क्रिकेट चाहते या रोमांचक सामन्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा : “अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप

येथे पाहता येईल लाईव्ह स्ट्रीमिंग

महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारतातील स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, सामना जिओ हॉटस्टार अॅपवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर जिओ हॉटस्टार अॅप डाउनलोड  करावे लागणार आहे. तसेच अंतिम सामना डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही शुल्काची गरज भासणार नाही.

अंतिम सामना आणि नाणेफेक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी २:३० वाजता होणार. भारतीय संघाने उपांत्य फेरीत शानदार कामगिरी केली, त्यामुळे त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

भारताची तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक

भारतीय महिला क्रिकेट संघ महिला विश्वचषक तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचला आहे. पहिल्यांदा २००५ मध्ये महिला विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाकडून ९८ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर, २०१७ मध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु इंग्लंडने त्यांना ९ धावांनी धूळ चारली होती. ज्यामुळे त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. आता, तिसऱ्यांदा, भारतीय संघ महिला विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला असून यावेळी, त्यांचे डोळे जेतेपदावर असणार आहे.

दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक 2025 संघ

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तंजामिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेके बॉश, सिनालो जाफ्ता, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुखुने, नॉन्डुमिसो शांगसेन, कारुसेन बोश, नॉन्डुमिसा.

Less than 24 hours to go for the #CWC25 Final: #INDvSA! 🙌🚨 How’s the preparation? What’s the team’s plan? Hear it from the captain, #HarmanpreetKaur herself! 💪💙#FollowTheBlues 👉 SAT, 1 NOV, 7 PM on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/SrtvcOekgC — Star Sports (@StarSportsIndia) November 1, 2025

हेही वाचा : ICC World Cup Final 2025 : विजेता संघ होणार मालमाल! मिळणार विक्रमी बक्षिसे; उपविजेत्या संघाचीही लागणार लॉटरी

विश्वचषक २०२५ साठी भारतीय महिला संघाचा संघ

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौर.

Web Title: Ind w vs sa w watch the final match between india and south africa for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women World Cup 2025
  • IND W vs SA W

संबंधित बातम्या

IND vs AUS : ‘हा विजय प्रत्येक भारतीय मुलीचे स्वप्न…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिलांच्या विजयावर तरुणांच्या प्रतिक्रिया 
1

IND vs AUS : ‘हा विजय प्रत्येक भारतीय मुलीचे स्वप्न…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिलांच्या विजयावर तरुणांच्या प्रतिक्रिया 

IND W vs SA W: भारतीय महिला संघ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान स्विकारण्यासाठी सज्ज! अंतिम सामन्यात ट्रॉफीचा दुष्काळ संपेल का?
2

IND W vs SA W: भारतीय महिला संघ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान स्विकारण्यासाठी सज्ज! अंतिम सामन्यात ट्रॉफीचा दुष्काळ संपेल का?

Women’s World Cup Final : भारत-दक्षिण आफ्रिका सामना ड्रॉ होणार, अंतिम सामन्यात 60 कोटी रुपये पणाला! वाचा सविस्तर
3

Women’s World Cup Final : भारत-दक्षिण आफ्रिका सामना ड्रॉ होणार, अंतिम सामन्यात 60 कोटी रुपये पणाला! वाचा सविस्तर

IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…
4

IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.