
IND W vs SL W: A spectacular catch at the boundary! The ball slipped from her hands three times...; finally, G. Kamalini took the catch; Video goes viral.
G. Kamalini’s amazing catch : भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेचा महिला संघ यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेवळवण्यात येत आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेतील चार सामने आपल्या नावे करून मालिकेत ४-१ अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली आहे. चौथ्या सामन्यादरम्यान, भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू जी. कमलिनीने सीमारेषेवर एक शानदार झेल टिपला आहे. कमलिनीचा हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला झेल ठरला आहे.
अरुधती रेड्डी भारतीय संघासाठी १९ वा षटक टाकत असताना या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, कविशाने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला आणि लॉन्ग ऑनवर उभी असलेली पर्यायी क्षेत्ररक्षक कमलिनीने त्वरीत चेंडूकडे धाव घेत अफलातून झेल पूर्ण केला. जरी चेंडू कमलिनीच्या हातातून घसरला तरी तिने चेंडूवरची नजर सुटू दिली नाही आणि चार प्रयत्नांनंतर झेल पूर्ण करण्यात यश मिळवले. जवळच उभ्या असलेल्या अमनजोत कौरने कॅच पूर्ण झाल्यानंतर पाहिले आणि आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
Kamalini’s first catch in International Cricket ✨#AaliRe #MumbaiIndians #INDvSL pic.twitter.com/gFj8nBagvn — Mumbai Indians (@mipaltan) December 28, 2025
WPL फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने कमलिनीच्या कॅचचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये लिहिले की, “कमलिनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला कॅच.” कमलिनीने WPL मधील सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम देखील नोंदवला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी, जी. कमलिनीने फक्त १६ वर्षे आणि २१३ दिवसांच्या वयात मुंबई इंडियन्ससाठी WPL मध्ये पदार्पण केले आहे.
प्रत्युत्तरादाखल, श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकामध्ये ६ गडी गमावून फक्त १९१ धावाच उभ्या करू शकला. कर्णधार चामारी अथापथुने संघाकडून ३७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या. हसिनी परेराने २० चेंडूत ७ चौकारांसह ३३ धावा केल्या, तर इमेशा दुलानीने २९ धावा काढल्या. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २, तर श्री चरणीने १ विकेट घेण्यात यश मिळवले.