Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गानेही साजरा केला ‘व्हॅलेन्टाईन्स डे’, नॉर्वेच्या आकाशात दिसलं एक अद्भुत दृश्य… पाहून युजर्स घायाळ; Video Viral

Heart Shape In The Sky : नॉर्वेजियन छायाचित्रकार क्रिस्टोफर वेंगेनने आपल्या कॅमेरात नॉर्वेच्या अरोरो येथील आकाशात दिसलेले सुंदर दृश्य टिपले आहे. यात आकाशात चमकत होत असलेली हृदयाची आकृती स्पष्ट दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 12, 2026 | 01:44 PM
निसर्गानेही साजरा केला 'व्हॅलेन्टाईन्स डे', नॉर्वेच्या आकाशात दिसलं एक अद्भुत दृश्य... पाहून युजर्स घायाळ; Video Viral

निसर्गानेही साजरा केला 'व्हॅलेन्टाईन्स डे', नॉर्वेच्या आकाशात दिसलं एक अद्भुत दृश्य... पाहून युजर्स घायाळ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेन्टाईन वीकदरम्यान नॉर्वेमध्ये आकाशात हृदयाच्या आकाराचा नॉर्दर्न लाइट्स दिसला.
  • हे दृश्य एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेरात कैद केले आहे.
  • इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या दृश्याला युजर्सद्वारे मोठी पसंती मिळत आहे.
७ फ्रेब्रुवारी २०२६ पासून व्हॅलेन्टाईन्स वीकला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण आठवडा असतो प्रेमाचा… यात कपल्स आपल्या जोडीदाराला काही खास भेटवस्तू देऊन आपलं त्याच्याविषयी असणारं प्रेम व्यक्त करतात. प्रत्येकाची प्रेम सादर करण्याची पद्धत वेगळी असू शकते. अलिकडेच सोशल मिडियावर एक अनोखे दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात आकाशात चमकत्या प्रकाशात एक सुंदर हार्ट दिसून आला जो प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो. हे दृश्य नॉर्वेच्या अरोरा येथे दिसले असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून आला आहे. चला या दृश्यांविषयी सविस्तर चर्चा करुया.

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

नॉर्दर्न लाइट्स म्हणून ओळखला जाणारा अरोरा ही एक नैसर्गिक घटना आहे जी पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात सर्वात जास्त दिसून येते. या वर्षीच्या अरोराने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. हा हृदयाच्या आकाराचा अरोरा केवळ दुर्मिळच नव्हता तर अविश्वसनीयपणे हृदयस्पर्शी देखील होता. नॉर्वेजियन छायाचित्रकार क्रिस्टोफर वेंगेन यांनी हा खास क्षण आपल्या कॅमेरात टिपला. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आणि संयमाने हे दृश्य कॅमेरात कैद करण्यात आले होते.

इंस्टाग्रामवर @krisvang नावाच्या अकाऊंटवरून पोस्टला शेअर करण्यात आले असून याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ मला नेहमीच नॉर्दन लाइट्सचा आकार टिपायचा होता. मी पक्षी, चक्रीवादळ, कवटी किंवा असे काहीतरी कल्पना केली. ते काही वेळा जवळून गेले आहे, पण मला कधीच आकार पुरेसा स्पष्ट वाटला नाही, तो फक्त गोंधळलेला दिसत होता. गेल्या शुक्रवारी मला शेवटी काहीतरी मिळाले! कदाचित हृदय थोडे क्लिच असेल, पण मी तक्रार करत नाहीये’.

SUV बॉनेटवर टांगून ड्रायव्हरने व्यक्तीला फरफटत नेलं, भयाण दृश्ये पाहून युजर्स झाले अवाक्; बेंगळुरीतील घटनेचा Video Viral

फोटोग्राफरने सांगितल्याप्रमाणे त्याला काहीतरी वेगळे टिपायचे होते पण हवेचा वेग हळूहळू बदलत असतानाच त्याला वेगळेच दृश्य हाती लागले ज्याने संपूर्ण जगाला आपल्या प्रेमात पाडले. आकाशात तरंगून आलेले हे हृदयाच्या आकाराचे हे दृश्य पाहणे काही साधी गोष्ट नाही. अनेकांना हा तंत्रज्ञान नसून निसर्गाचा अद्भूत चमत्कार असल्याचे वाटत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका यूजरने लिहिले आहे की, “मी पाहिलेल्या सर्वात सुंदर नॉर्दर्न लाईट फोटोंपैकी हे एक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ असे वाटत आहे जणू आकाश प्रेमाने भरलेले आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नेहमीच माहित आहे की तू कधीही तुमचे शॉट्स व्ह्यूजसाठी एआय करणार नाहीस, काय शॉट घेतला आहेस, एकदम कमाल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Nature celebrates valentine day too a mesmerizing phenomenon lights up norways sky netizens left spellbound video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • beating video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral
1

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
2

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
3

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
4

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.