Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup Rising Stars 2025 : वैभव सूर्यवंशीचे शतक फळाला! भारत अ संघाने UAE ला 148 धावांनी लोळवले

आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारतीय अ संघाने युएईविरुद्ध विजय मिळवून विजयी सुरुवात केली आहे. भारत अ संघाने युएईचा १४८ धावांनी धुव्वा उडवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 14, 2025 | 09:12 PM
Asia Cup Rising Stars 2025: Vaibhav Suryavanshi hits century! India A crushes UAE by 148 runs

Asia Cup Rising Stars 2025: Vaibhav Suryavanshi hits century! India A crushes UAE by 148 runs

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारत अ संघाची विजयी सुरुवात 
  • भारत अ संघाकडून युएईचा १४८ धावांनी पराभव 
  • वैभव सूर्यवंशीचे ३२ चेंडूत स्फोटक शतक 
Asia Cup Rising Stars 2025, India A defeated UAE by 148 runs: आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारतीय अ संघाने विजयी सुरवात केली. युएईविरुद्धच्या या सामन्यात भारताने १४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी हीरो ठरला, युएई विरुद्ध वैभव सूर्यवंशीने फक्त ३२ चेंडूत शतक झळकवले आहे. त्याच्या शतकाच्या जोरवार भारत अ संघाने ४ बाद २९७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात युएई संघ २० ओव्हरमध्ये ७ गडी गमावून १४९ धावाच करू शकला. त्यामुळे भारतीय अ संघाने १४८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

वैभवने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने या शतकासह एक विशेष कामगिरी केली आहे. वैभव सूर्यवंशी आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा जगातील चौथा खेळाडू बनला आहे. वैभव सूर्यवंशीने प्रथम फक्त १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते, तर पुढील १७ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी ४२ चेंडूत १४४ धावा काढल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि १५ षटकार मारले.

हेही वाचा : IND vs SA 1st Test: जसप्रीत बुमराहची ‘खास’ क्लबमध्ये एंट्री! सहा वर्षांत अशी किमया साधणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

त्यानंतर त्याने आपली तीच लय कायम ठेवत ३२ चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले. वैभव सूर्यवंशी ४२ चेंडूत १४४ धावांवर माघारी परतला. या दरम्यान, वैभवने १४ व्या वर्षी, वैभव या स्पर्धेत शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला आहे. वैभव भारत अ संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाजही ठरला आहे. कर्णधार जितेश शर्माने देखील ३२ चेंडूत स्फोटक ८३ धावांची खेळी साकारली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लगावले आहे.  वैभव  आणि जितेशच्या खेळीमुळे भारतीय संघाने युएई संघासमोर २९८ धावांचे लक्ष्य उभे केले होते.

भारतीय संघाने दिलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईचा डाव १४९ धावाच करू शकला. युएईकडून सोहेब खानने ४१ चेंडूत ६३ धावांची खेळी केली परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सय्यद हैदर २० धावा आणि  मुहम्मद अरफान २६ धावांचे योगदान दिले, मात्र हे प्रयत्न अपुरे पडले. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबेने २ विकेट्स घेतल्या. रमणदीप सिंग  आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.

हेही वाचा : SRH कडून मोहम्मद शमीचा व्यापार! हा स्टार वेगवान ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात; किती कोटी मोजावे लागले?

दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारत अ संघाने २० षटकांत ४ विकेट गमावून २९७ धावांचा डोंगर उभा केला आहे.

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन

भारत अ: प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, सुयश शर्मा

संयुक्त अरब अमिराती : अलिशान शराफू (कर्णधार), सय्यद हैदर (यष्टीरक्षक), सोहेब खान, मयंक राजेश कुमार, हर्षित कौशिक, अयान अफजल खान, अहमद तारिक, मोहम्मद अरफान, मोहम्मद फराजुद्दीन, मोहम्मद रोहिद खान, मोहम्मद जवादुल्ला

Web Title: India a defeats uae by 148 runs in asia cup rising stars 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:12 PM

Topics:  

  • IND vs UAE
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs SA U19  Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
1

IND vs SA U19 Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.