
न्यूझीलंडविरुद्ध भारताने घेतली 118 रन्सची आघाडी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे भारतीय फलंदाजांच्या नावावर राहिला आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारताने 4 विकेट्स गमावत 486 रन्सची मजल मारली आहे. भारताकडे आता 118 रन्सची निर्णायक आघाडी आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळत आहे.
Cometh a big challenge, cometh a 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡 🫡 #TeamIndia | #NZvIND | @klrahul https://t.co/PVan8Q48ty — BCCI (@BCCI) November 21, 2026
भारतीय संघातील टॉप 5 फलंदाजांनी परदेशात एकाच डावात 50 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी हा अनोखा विक्रम रचला असून, परदेशात हे प्रथमच घडले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये याआधी चार वेळेस एकाच डावात पहिल्या 5 फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स करण्याची कामगिरी केली होती. मात्र हा रेकॉर्ड भारतातच झाला होता. यंदा भारतीय संघाने हा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या भूमीत म्हणजेच परदेशात करून दाखवला आहे.
KL Rahul: शतक एक अन् रेकॉर्ड अनेक! न्यूझीलंडमध्ये शतक झळकवत के एल राहुलने रचला इतिहास
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात परदेशी भूमीवर पहिल्या पाचही फलंदाजांनी ५० किंवा त्याहून अधिक रन्स करण्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. केएल राहुलने शानदार शतक झळकावले आहे. कर्णधार शुभमन गिल 98 रन्स, यशस्वी जयस्वालने 85 रन्स आणि देवदत्त पडीकल 80 व ऋषभ पंत 55 या फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स केल्या आहेत आणि हा नाव रेकॉर्ड रचला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताने 4 बाद 486 रन्स करत 118 रन्सची आघाडी घेतली आहे. या सामन्याचा चौथा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. तसेच पहिले स्तर देखील अत्यंत महत्वाचे समजले जात आहे. भारताने जर आघाडी आणखी वाढवली, तर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरल्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांवर पहिल्यापासूनच दबाव असणार आहे.
आज कर्णधार शुभमन गिल देखील चांगल्या लयीत खेळत होता. मात्र त्याचे शतक केवळ 2 रन्सने हुकले आहे. कर्णधार शुभमन गिल 98 रन्सवर आउट झाला. मात्र सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या फलंदाजांनी आपल्या नावावर केल्याचे दिसून आले. ही टेस्ट सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत असल्याने भारतासाठी दोन्ही सामने महत्वाचे असणार आहे.
Ans: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 विकेट्स गमावत 486 धावा केल्या होत्या. भारताकडे 118 धावांची आघाडी होती.
Ans: भारताकडून केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध आक्रमक शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.