Asia Cup 2025: Despite winning, Indian team fails? Pakistan maintains dominance in 'this' area; Read in detail
Catches dropped in Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सुपर-४ सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने गट टप्यात आणि सुपर ४ सामन्यात देखील दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आता आशिया कप (Asia Cup 2025 ) स्पर्धेतील आणखी फक्त दोन सुपर-४ सामने शिल्लक आहेत. अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. २४ सप्टेंबर रोजी भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आज पाकिस्तन आणि बांगलादेश यांच्यात सुपर ४ सामना खेळला जात आहे. आज जो जिंकेल तो भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण १६ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाची झेल पकडण्याची कामगिरी सर्वात वाईट राहिली आहे.
हेही वाचा : रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारतीय संघाची क्षेत्ररक्षण आणि झेल पकडण्याची कामगिरी सर्वात वाईट राहिल्याचे दिसत आहे. या बाबतीत युएई संघ भारतापेक्षा अधिक चांगला खेळल्या दिसत आहे. या स्पर्धेत त्यांनी फक्त दोन झेल सोडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक झेल सोडल्याची माहिती आहे. ज्याची झेल पकडण्याची कार्यक्षमता फक्त ६७.५% इतकी आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेत ढिसाळ क्षेत्ररक्षण केले आहे. भारतीय संघाने पाच सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये भारताने तब्बल १२ झेल सोडले आहेत. हाँगकाँग आणि चीनचे क्षेत्ररक्षण देखील सर्वात वाईट राहिले आहे. हाँगकाँगने फक्त तीन सामन्यांमध्ये ११ झेल सोडले आहेत. यामध्ये त्यांची झेल पकडण्याची कार्यक्षमता फक्त ५२.१% इतकीच आहे, जी या स्पर्धेत सर्वात कमी आहे.
हेही वाचा : बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी केलेली दिसून येत आहे. पाकिस्तान संघाने आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत फक्त तीन झेल सोडलेले आहेत. पाकिस्तान संघाची झेल पकडण्याची क्षमता ८६.३% इतकी आहे. पाकिस्तान संघ अव्वल क्षेत्ररक्षण संघ म्हणून उदयास आला आहे. तसेच युएई (८५.७%) आणि अफगाणिस्तान आणि ओमान (७६.४%) यांनीही क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली आहे.