भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Team India’s Impact Player Medal : आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. काल २४ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या विजयात अनेक खेळाडूंनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या सामन्यात अर्धशतक झळकवणाऱ्या अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर बीसीसीआयने कुलदीप यादवला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्ध ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली. कुलदीपच्या कामगिरीमुळे भारतीय संघाचा विजय सोपा झाला. कुलदीपची त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कामगिरी विश्लेषक हरी मोहन प्रसाद यांच्याकडून कुलदीपला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा : Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…
बीसीसीआयकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये, विश्लेषकाकडून डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज त्याच्या व्हेरिएशनने प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. मोहन म्हणाले की, इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कार चेंडूने असाधारणपणे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो. आजच्या टी-२० क्रिकेटमध्ये, स्पिन, ड्रिफ्ट आणि डिपचे कौशल्य इतके सातत्यपूर्णपणे दाखवणारे फारच कमी खेळाडू दिसतात. म्हणूनच, हा पुरस्कार कुलदीप यादवकडे जातो.
कुलदीप यादव आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे (एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही एकत्रित). २०२५ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाचा विक्रम (२९ विकेट) मोडण्यासाठी त्याला फक्त दोन विकेट गरजेच्या होत्या. कुलदीपने परवेझ हुसेन इमोन आणि रियाद हुसेनला बाद करून हा विक्रम प्रस्थापित केला.
हेही वाचा : रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
नाणेफेक गमावणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट गमावून १६८ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने ३८ आणि शुभमन गिलने २९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरादाखल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा संघ १२७ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारताने ४१ धावांनी सामना जिंकला. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या.