फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतामध्ये सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिका सुरू आहेत तर शेजारील देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा संघ कसोटी मालिका खेळत आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा सातत्याने वादात आणि चर्चित राहिला आहे. पाकिस्तानचा दिवस हा भारताचे नाव घेतल्याशिवाय जात नाही असेच काहीसे आहे. आशिया कपची ट्रॉफी दिली नाही म्हणून मोहसीन नक्वी यांचा सत्कार करण्यात आला म्हणजेच हास्यास्पदच आहे. आशिया कपच्या वादनंतर आता आणखी एक व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 5 विकेट गमावून 313 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला. तथापि, प्रेक्षकांना त्याला पाहण्याची उत्सुकता होती. सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शॉन पोलॉकने एक टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्याने पाकिस्तानी कर्णधाराला भारतीय कर्णधार म्हणून संबोधले, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Shaun Pollock “I can’t believe that they (crowd) want the captain of Pakistan to get out just to see Babar Azam at the crease” 😭😭pic.twitter.com/qov8q8Fssq — Hassan Abbasian (@HassanAbbasian) October 12, 2025
पहिल्या डावात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज शॉन पोलॉक यांना प्रेक्षकांमध्ये काहीतरी असामान्य दिसले. जेव्हा जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजाला बाद करण्याचे आवाहन करायचे तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असे. स्टार फलंदाज बाबर आझम फलंदाजीसाठी पुढच्या रांगेत होता, त्यामुळे सर्वजण त्याला फलंदाजी करताना पाहण्यास उत्सुक होते.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना पोलॉक म्हणाला, “मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. त्यांना टीम इंडियाचा कर्णधार शान मसूद बाहेर हवा आहे जेणेकरून बाबर आझम क्रीजवर येऊ शकेल.”
बाबर आझमला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती, परंतु पहिल्या डावात तो लक्षणीय प्रभाव पाडू शकला नाही. त्याने ४८ चेंडूंचा सामना केला आणि फक्त चार चौकार मारत २३ धावा केल्या. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि इमाम-उल-हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. दिवसाच्या खेळाच्या शेवटी मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा नाबाद राहिले.