फोटो सौजन्य - बीसीसीआय वूमन
भारताच्या महिला संघाच्या विश्वचषकामध्ये सलग दोन विजयानंतर आता सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे भारतीय महिला संघाचे सेमी फायनलचे चान्स हे कमी होत चालले आहे. कालचा सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली पण गोलंदाजांनी निराश केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवार, १२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाकडून ३ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर, भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण झाला आहे.
भारताने आतापर्यंत स्पर्धेत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. ऑस्ट्रेलियापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारताला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला होता. भारताचे उर्वरित तीन सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला कसे तिकीट मिळू शकते ते आपण समजून घेऊया. सलग दोन सामने गमावल्यानंतरही, भारत पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांचा नेट रन रेट +0.682 राहिला आहे, जो भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Australia win the match by 3 wickets.#TeamIndia fought spiritedly and will look to bounce back in the next match. Scorecard ▶ https://t.co/VP5FlL2S6Y#WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS pic.twitter.com/dc473c4dDW — BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
दरम्यान, सलग तिसऱ्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे असे दोन संघ आहेत ज्यांना अद्याप एकही पराभव पत्करावा लागला नाही. त्यांचे सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे. परिणामी, उर्वरित सहा संघांपैकी फक्त दोनच संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. हरमनप्रीत कौर आणि कंपनीला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशला पराभूत करावे लागेल.
IND W vs AUS W : अॅलिसा हिलीच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला रचला इतिहास! संघाच्या नावावर नवा रेकाॅर्ड
तीन विजयांमुळे भारताच्या खात्यात १० गुणांची भर पडेल आणि त्यामुळे बाद फेरीत स्थान निश्चित होण्याची शक्यता आहे. जर भारताला एकाही पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत भारताच्या संधींसाठी आव्हान निर्माण करू शकतात. भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी 153 धावांची भागीदारी केली होती. टीम इंडियाने 30 ओवर मध्ये एकही विकेट न गमावता फलंदाजी करूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा पुढील सामना हा इंग्लंड विरुद्ध असणार आहे इंग्लंडचा संघ विश्वचषकामध्ये मजबूत स्थितीत आहे.