Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: भारताकडून पराभवानंतर अफगाणिस्तानला मोठा धक्का; ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई

ICC Fined Afg Captain Hasmatullah Shahidi: भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला असून एक डिमेरिट पॉईंटही ठोठावण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 01:27 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानला मोठा धक्का
  • ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई
  • नेमकं काय प्रकरण?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत अफगाणिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध एकही विजय नोंदवता आला नाही. चेन्नई येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाण कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शानदार शतक झळकावले, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता या दारुण पराभवानंतर कर्णधार शाहिदीला मोठा धक्का बसला आहे. सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अधिकृतपणे फटकारले असून त्याला शिस्तभंगासाठी एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा मानला जात आहे.

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

नेमकं काय प्रकरण?

आयसीसीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘शाहिदीने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१०.१० चे उल्लंघन केले आहे, जे फलंदाजी करताना खेळपट्टीचे जाणीवपूर्वक किंवा टाळता येण्याजोगे नुकसान करण्याशी संबधित आहे.’ चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान, फलंदाजी करताना खेळपट्टीचे नुकसान केल्याचे ICC च्या निदर्शनास आले.यासाठी शाहिदीला शिस्तभंगाच्या नोंदीसह एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे.

सामन्यादरम्यान, फलंदाजी करताना खेळपट्टीवर धावल्याबद्दल शाहिदीला दोन वेळा अनधिकृत चेतावणी देण्यात आली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या डावाच्या ३१ व्या षटकात त्याला अधिकृत चेतावणी मिळाली. मात्र, ४० व्या षटकात खेळपट्टी ओलांडून धावण्याची चूक त्याने पुन्हा केली. वारंवार चेतावणी देऊनही नियमांचे पालन न केल्यामुळे अफगाणिस्तानवर पाच धावांचा दंड आकारण्यात आला.

हशमतुल्लाने मान्य केली चूक

हशमतुल्ला शाहिदीने आपली चूक मान्य केली आणि आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रंजन मदुगल्ले यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता झाली नाही. हा आरोप मैदानातील पंच ख्रिस गॅफनी आणि रोहन पंडित, तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी नोंदवला होता. आयसीसीच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनासाठी अधिकृत चेतावणी, खेळाडूच्या सामना शुल्काच्या ५० टक्क्यांपर्यंत दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्सची तरतूद आहे.

शाहिदीचे शतक पण अफगाणिस्तानचा पराभव

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४४.२ षटकांत २१८ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शानदार फलंदाजी करत १०२ धावा केल्या, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. परंतु, भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी करत नऊ षटकांत २३ धावा देऊन पाच विकेट्स घेतले.

२१९ धावांचे लक्ष्य गाठताना, सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी झाली. रोहित शर्माने ७९ धावा केल्या, तर जयस्वालने ८६ चेंडूंमध्ये ११० धावांची नाबाद खेळी केली. जयस्वालच्या खेळीत १४ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. भारताने केवळ एक विकेट गमावून १२८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि नऊ विकेट्सने  शानदार विजय नोंदवला.

FIFA World Cup 2026 मध्ये इतिहास! सर्वात जलद 100 गोल्सचा टप्पा पूर्ण, फुटबॉलचा रोमांचक शो

Web Title: India vs afghanistan icc reprimand afghanistan captain hashmatullah shahidi pitch code of conduct odi chennai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • ICC
  • IND vs AFG

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?
1

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

Cricket News: कोण आहे अखिलेश रेड्डी, मॅच फिक्सिंगनंतर पुरावे केले गायब; 8 वर्षांसाठी ICC ने घातली बंदी
2

Cricket News: कोण आहे अखिलेश रेड्डी, मॅच फिक्सिंगनंतर पुरावे केले गायब; 8 वर्षांसाठी ICC ने घातली बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.