Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगात भारी आपली Team India! ICC T20 Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान; तर श्रेयस अय्यर…

Abhishek Sharma: भारतीय T20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी देखील न्यूझीलंडची सिरीज लाभदायक ठरली आहे. त्याने आयसीसी क्रमवारीत थेट 7 व्या स्थानावर उडी मारली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 04:28 PM
IND Vs NZ T20 Series

IND Vs NZ T20 Series

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मा आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानी 
  • न्यूझीलंडमध्ये अभिषेक शर्माची शानदार खेळी 
  • श्रेयस अय्यरने देखील मारली मोठी उडी 
Abhishek Sharma: भारतीय टी 20 संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यातच भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा हा आक्रमक खेळ करताना दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 सिरीजमध्ये त्याने चांगली खेळी केल्याचे दिसून आले. त्याच्या या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे.  टी 20 क्रिकेटच्या फॉर्मटमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या नंबरचा फलंदाज बनला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या T20 फलंदाजांच्या ताज्या आकडेवारी आणि रँकिंगमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने आपले निर्विवाद वर्चस्व राखत जगातील नंबर १ फलंदाज म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.

आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर अभिषेक शर्माने T20 रँकिंगमधील आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे. आयसीसी रॅंकिंगमध्ये तो सध्या पहिल्या स्थानावर आहे.  पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान या ताज्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर  विराजमान आहे. काही दिवसांपूर्वी T20 क्रमवारीत अव्वल असलेल्या इशान किशनच्या पॉईंट्समध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 40 धावा अन् तुटणार सूर्यकुमार यादवचा मोठा रेकॉर्ड, ठरणार धुरंधर!

भारतीय T20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी देखील न्यूझीलंडची सिरीज लाभदायक ठरली आहे. त्याने आयसीसी क्रमवारीत थेट 7 व्या स्थानावर उडी मारली आहे. ICC च्या या ताज्या टी-२० क्रमवारीत भारताच्या खेळाडूंनी आपली चमक दाखवून दिली आहे. एका बाजूला अभिषेक शर्माने अव्वल स्थान बळकावून ठेवले आहे, तर दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यरने घेतलेली सातव्या क्रमांकावरील झेप भारतीय संघासाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सिरीज संपून वनडे सिरीज सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा विजय झाला आहे. त्याच वेळेस आयसीसीने T20 फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या रँकिंगमध्ये भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आपले पहिले स्थान टिकवून आहे. भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या 889 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. T20 मालिका संपून आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामने खेळवले जात आहेत. मात्र पुढील टी 20 सिरीजमध्ये देखील अभिषेक शर्माला साजेसा खेळ करावा लागेल. तरच तो त्याचे हे पहिले स्थान टिकवून ठेवू शकतो.

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयसीसीच्या टी 20 रॅंकिंगमध्ये पहिला फलंदाज कोण आहे?

    Ans: आयसीसीच्या टी 20 रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अभिषेक शर्मा आहे.

  • Que: भारतीय संघ कोणाविरुद्ध नूतकच टी 20 सिरीज खेळला आहे?

    Ans: भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सिरीज खेळली आहे.

Web Title: Icc announced t20 ranking abhishek sharma first rank ind vs nz tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • ICC
  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
1

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
2

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

IND vs NZ:  King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज
3

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान
4

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.